भारताकडून पराभव झाल्यानंतर पाकिस्तानचे प्रशिक्षक मिकी आर्थर आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ८९ धावांनी पराभव करत या स्पर्धेत आपली विजयी मालिका कायम राखली आहे. या सामन्यानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव तर पाकिस्तान संघावर टीका सुरु झाली होती. भारताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानी खेळाडूंना मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोरे जावे लागत आहे. सोशल मीडियावर देखील खेळाडूंना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. त्यानंतर आता पाकिस्तानचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी एक वक्तव्य करून क्रीडा विश्वात खळबळ उडवून दिली आहे.

भारताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर आत्महत्या करावी वाटली होती,असे वक्तव्य करून त्यांनी खळबळ उडवून दिली आहे. भारताविरुद्ध झालेला पराभव सर्वात जिव्हारी लागला होता, त्यामुळे तो धक्कादायक पराभव पचवणे थोडे अवघड गेले असेदेखील त्यांनी यावेळी म्हटले. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ८९ धावांनी पराभव केला होता.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळवलेल्या विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले कि, वर्ल्डकप सारख्या स्पर्धेत जेव्हा तुमचा एकदा पराभव होतो तेव्हा पुन्हा तुमचा पराभव होण्याची शक्यता वाढते. प्रत्येक पराभवामुळे तुमच्यावरील तणाव वाढत जातो. भारतासारख्या संघाविरुद्ध खेळत असताना चाहत्यांच्या अपेक्षा जास्त असतात. सर्वांचे लक्ष तुमच्या कामगिरीवर असते. त्यामुळेच प्रशिक्षक या नात्याने माझ्यावर देखील तितकाच दबाव होता.

त्यामुळे पराभव झाल्यानंतर माझ्या मनात आत्महत्या करण्याचा विचार आला होता असे त्यांनी म्हटले. भारताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर पाकिस्तान संघाने जोरदार कमबॅक करत दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवून सेमीफायनलच्या आशा पल्लवित ठेवल्या आहेत.

सेमीफायलमध्ये भारत पाक आमने सामने

अशा परिस्थितीत जर पाकिस्तानने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला तर पुन्हा एकदा क्रिकेट रसिकांना भारत आणि पाकिस्तान सामना बघायला मिळू शकतो. पाकिस्तानने पुढील तीनही सामन्यात विजय मिळवला तर पाकिस्तान गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर येऊ शकतो. अशा परिस्थितीत भारत आणि पाक पुन्हा पुन्हा एकदा आमने सामने येऊ शकतात.

परंतु हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा भारतीय संघ आपले उर्वरित सर्व सामने जिंकून गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आला आणि पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर. जर असे झाले तर भारत आणि पाक पुन्हा मँचेस्टरच्या मैदानावर आमनेसामने येतील जेथे भारताने पाकिस्तानला १६ जून रोजी झालेल्या साखळी सामन्यात हरवले होते. मात्र भारताला पहिल्या क्रमांकावर राहण्यासाठी न्यूझीलंडच्या कामगिरीचा देखील आधार घ्यावा लागणार आहे. कारण न्यूझीलंडचा संघ देखील या स्पर्धेत अपराजित आहे.

दरम्यान, इंग्लंडविरुद्ध भारताचा सामना ३० जूनला होणार आहे. दरम्यान त्याआधी भारत बांगलादेश आणि वेस्ट इंडिजविरुद्ध लढेल. भारताने गुणतक्त्यात पहिले स्थान मिळवल्यास चौथ्या स्थानावर असलेल्या संघासोबत सेमिफायनलला लढत होईल.त्यामुळे आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात सेमीफायननला लढत होते कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आरोग्य विषयक वृत्त

नेहमीच जेवणावर ताव मारत असाल तर होऊ शकतो ‘हा’ त्रास

व्यायामानंतर ‘या’ ७ चुका टाळा ; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

माझ्या मानसिक आजाराने खूप काही शिकवलं- दीपिकाने केला खुलासा

रक्ताची गाठही ठरू शकते मृत्यूचे कारण ; वेळीच व्हा सावध