एअर स्ट्राइकचे ‘सत्य’ लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड

जाबा (पाकिस्तान) : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीर येथील पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथील दहशतवादी तळांवर हल्ला करत तेथील दहशतवादी तळं नष्ट केली. परंतु ही कारवाई जगासमोर येऊ नये यासाठी पाकिस्तानची धडपड होताना दिसत आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये ज्याठिाकणी भारताने हल्ला केला त्याठिकाणी पाकिस्तानचे सुरक्षा अधिकारी मीडियाला जाऊ देत नाहीत. त्या ठिकाणी मीडियाला जाण्यास बंदी घातल्याचे समजत आहे.

गुरुवारीच (दि 7 मार्च) मीडियाच्या एका टीमला याचा अनुभव आला. न्यूज एजन्सी राॅयटर्सच्या एका टीमला भारताच्या हवाई दलाने कारवाई केलेल्या ठिकाणी जाण्यास पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी विरोध केला. भारताकडून करण्यात आलेल्या कारवाईत भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोटमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ दहशतवादी संघटनेच्या तळांना लक्ष केले होते. त्यात जैशच्या अनेक कमांडरसह या संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याचा भाऊ आणि मेहुणा यांचा खात्मा करण्यात आला. याठिकाणी पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी मीडिया टीमला जाण्यास विरोध केला आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून मोठी कारवाई केली. बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेच्या तळांवर भारताच्या ‘मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी 1000 किलोचे बॉम्ब फेकले होते. यात जवळपास 300 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात येते. तसेच या कारवाईत जैशच्या अनेक कमांडरसह या संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याचा भाऊ आणि मेहुणा यांचा खात्मा करण्यात आला.

ह्याहि बातम्या वाचा

दुर्दैव ! महिला दिनीच नवजात चिमुकलीला पार्किंगमध्ये सोडलं

भारतातल्या काहींच्या भाषणामुळे पाकिस्तानला मदत : नरेंद्र मोदी

“अभिनंदन वर्धमान यांना परमवीर चक्र देण्यात यावा”