Coronavirus In Pakistan : ‘कोरोना’चे 40 हजारपेक्षा जास्त रूग्ण, 900 लोकांचा मृत्यू

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – पाकिस्तानमध्ये कोरोना व्हायरस (कोविड-19) ची आतापर्यंत सुमारे 40 हजारपेक्षा जास्त प्रकरणे समोर आली आहेत. पाकच्या आरोग्य मंत्रालयानुसार, संसर्गामुळे 873 लोकांचा मृत्यू झाला असून बाधितांची संख्या 40,151 झाली आहे. मागील 24 तासात 1,352 नवीन रूग्ण सापडले आहेत. वृत्तसंस्था सिन्हुआने ही माहिती मंत्रलयाचा संदर्भ देऊन प्रसिद्ध केली आहे.

पाकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयानुसार, 27,937 रूग्णांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर 11,341 रूग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. एकुण पूर्ववत होणार्‍या प्रकरणांची संख्या 28.2 टक्के आहे. सिंध प्रांत 15,590 प्रकरणांसह सर्वात प्रभावित क्षेत्र आहे. यानंतर पंजाब प्रांतात 14,584 रूग्ण सापडले आहेत. खैबर पख्तून ख्वा प्रांत 305 मृत्यूंसह 5,847 प्रकरणानंतर तिसर्‍या स्थानी आहे. सुमारे 2,544 प्रकरणे बलूचिस्तान प्रांत आणि देशाची राजधानी इस्लामाबादमध्ये 947 आणि उत्तरी गिलगिट-बाल्टिस्तान क्षेत्रात 527 रूग्ण सापडले आहेत.

पाकिस्तानात इम्रान खान सरकारने 9 मेपासून लॉकडाऊनमध्ये सूट देण्यास सुरूवात केली आहे. देशात उद्योग सुरू करण्यात आले आहेत आणि लोकांना नियमांचे पालन करण्याची सक्ती करण्यात आली आहे. याशिवाय, पाकिस्तान नागरी उड्डयन प्राधिकरणाने 31 मेपर्यंत अंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्याची घोषणा केली आहे. काही प्रमाणात अंतर्गत हवाई वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.