Coronavirus : पाकिस्तानमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 78 बळी, आतापर्यंत 1395 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  कोरोना विषाणूच्या साथीमुळे गेल्या 24 तासांत आणखी 78 जणांचा मृत्यू झाला, असे आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितले. यासह देशात एकूण 1,395 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, देशात आतापर्यंत 532,037 कोव्हीड -19 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. शुक्रवारी 12,020 चाचण्या घेण्यात आल्या. मंत्रालयाने म्हटले आहे की, गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूचे 2,429 रुग्ण आढळले असून देशात एकूण, 66,4577 रुग्णांची नोंद झाली आहे.

सिंधमध्ये सर्वाधिक 26,113 कोरोना विषाणूची नोंद झाली असून त्यानंतर पंजाबमध्ये 24,104, खैबर-पख्तूनख्वा येथे 9,067, बलुचिस्तानमध्ये 4,087, इस्लामाबादमध्ये 2,192, गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये 660 आणि पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) 234 रुग्ण आढळले आहेत. मंत्रालयाने म्हटले आहे की, 24,131 रूग्णही बरे झाले आहेत. त्याच वेळी, शुक्रवारी रात्री फ्रंटियर प्रांत आणि अंमली पदार्थ नियंत्रण राज्यमंत्री शेहीरार आफ्रिदी यांनी ट्विट केले की, त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे. ते म्हणाले की, “डॉक्टरद्वारे निर्देशित घरात मी स्वत: ला अलग केले आहे.”

दरम्यान, कोरोना विषाणूच्या संकटाला तोंड देण्यासाठी युकेने पाकिस्तानला रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानला अतिरिक्त 4.39 मिलियन डॉलर्सची मदत जाहीर केली गेली आहे. एप्रिलमध्ये यूकेने कोविड -19 साथीविरुद्ध लढण्यासाठी पाकिस्तानला 2.67 मिलियन डॉलर्सचा निधी दिला होता.

जग सर्वत्र कोरोना साथीच्या रोगामुळे त्रस्त आहे. वर्ल्डोमीटरच्या म्हणण्यानुसार, जगात या विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 3 लाख 66 हजाराहून अधिक झाली आहे आणि संक्रमितांची संख्या 60 लाख 33 हजारांपेक्षा जास्त आहे, तर 26 लाख 61 हजाराहून अधिक लोकांनी कोरोनाला मात दिली आहे. त्याचबरोबर जगभरात सर्वाधिक बाधीत झालेल्या कोरोनामुळे 1 लाख 4 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 17 लाख 93 हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.