पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डानं सरफराजकडून ‘कॅप्टन’ शीप काढली, ‘या’ दोघांवर आता ‘टेस्ट’ आणि ‘T-20’ ची जबाबदारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आज कर्णधार सरफराज अहमद याची कर्णधारपदावरून हकालपट्टी केली आहे. त्याच्या जागी आता कसोटीमध्ये अझहर अली आणि टी -20 मध्ये बाबर आझम हे नेतृत्व करणार आहे. मात्र एकदिवसीय सामन्यांसाठी कर्णधारपदाची घोषणा केलेली नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या आधी पाकिस्तान बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. याठिकाणी पाकिस्तान तीन टी-20 सामने आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे.

वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानी संघाच्या झालेल्या खराब कामगिरीनंतर बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या तीन टी-20 मालिकेत देखील पाकिस्तानी संघाला 3-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे सरफराज याची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला.

सराफराजच्या नेतृत्वखाली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली
2017 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानने भारताला पराभूत करून विजय मिळवला होता. मात्र नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानी संघाला सेमीफायनलमध्ये देखील प्रवेश करता आला नव्हता.

बाबर आझम आणि अली यांना शुभेच्छा : सरफराज
या निर्णयाविषयी बोलताना सरफराज म्हणाला कि, इतक्या मोठ्या पातळीवर देशाचे नेतृत्व करणे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती. त्यामुळे या दोघांना भविष्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा. तसेच दोघेही उत्तम यश मिळवतील अशी आशा आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी