काय सांगता ! होय, पाकिस्तानच्या क्रिकेटपटूनं मैदानात चक्क काढले कपडे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संघात खेळाडूची निवड करण्यापूर्वी त्यांची कामगिरी पाहिली जाते. परंतु एका क्रिकेटपटूने संघात निवड न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्याने भर मैदानात सर्वांसमोर कपडे काढले. यामुळे ही घटना सोशल मीडियावर चर्चेत आली.

आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडणारा पाकिस्तानी स्टार विकेटकीपर उमर अकमल याच्यावर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. वृत्तानुसार उमर नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये फिटनेस टेस्ट देण्यासाठी आला होता. परंतु तो टेस्टमध्ये पास झाला नाही. फिटनेस टेस्टमध्ये उमरच्या शरीरातील फॅट तपासण्यात आले. त्यात तो पास झाला नाही. त्यामुळे संतापलेल्या उमरने प्रशिक्षकासमोरच आपल्या अंगावरील कपडे काढले.

उमर यावर थांबला नाही. त्याने प्रशिक्षकासोबत वादही घातला. उमरने मैदानावर सर्व जण असताना कपडे काढले आणि विचारले की कुठे फॅट आहे ते सांगा. यानंतर फिटनेस टीमने उमरची तक्रार पाकिस्तान क्रिकेट बोर्डकडे केली. उमरच्या या गैरव्यवहारामुळे त्यांच्यावर बंदी घातली जाऊ शकते किंवा त्याला पुढील मालिकेतून वगळले जाऊ शकते. उमरचा मोठा भाऊ कामरान आणि माजी कर्णधार सलमान बट्ट देखील फिटनेस चाचणीत पास होऊ शकेल नाहीत.

स्वत:च्या चुकीच्या वर्तनामुळे चर्चेत येण्याची उमरची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील तो वादात अडकला होता. 2017 मध्ये वर्तनामुळे इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून त्याला माघारी पाठवण्यात आले होते. तेव्हा देखील तो फिटनेस टेस्टमध्ये पास झाला नव्हता. तत्कालीन कोच मिकी आर्थरने उमरवर कारवाई केली होती.

उमरसह कामरान आणि माजी कर्णधार सलमान बट्ट देखील फिटनेस टेस्टमध्ये पास होऊ शकले नाहीत. कामरानला अनेक वेळा फिटनेस टेस्टसाठी बोलावण्यात आले होते. परंतु तो टेस्ट देण्यास टाळाटाळ करत होता. अखेर 28 जानेवारीला तो टेस्ट देण्यासाठी आला. पण तो पास होऊ शकला नाही. सलमान बट्टने देखील फिटनेस टेस्ट पूर्ण केली नाही. फिटनेस टेस्ट अर्धवट सोडून तो निघून गेला. त्याच्यावर देखील कारवाईची शक्यता आहे.

या तिन्ही खेळाडूंना पीसीबीकडून करार मिळालेला नाही. एवढेच नाही तर त्यांच्या स्थानिक संघाने देखील या तिघांना करारबद्ध केले नाही. सध्या उमर, कामरान आणि बट्ट हे कोणत्याही कराराशिवाय खेळत आहेत.