पाकिस्तानी क्रिकेटर हसन बनला भारताचा ‘जावई’, केलं ‘या’ भारतीय मुलीशी लग्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेक पाकिस्तानी खेळाडू भारतीय मुलींशी विवाहबंधनात अडकले आहेत. त्यात झहीर अब्बास, मोहसीन आणि शोएब मलिक यांच्या यादीत आता अजून एक नाव सामील झाले आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज क्रिकेटर हसन अलीने हरियाणाच्या शमिया आरजू नावाच्या मुलीशी मंगळवारी (ता. २०) दुबईत लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.

वृत्तसंस्थानी दिलेल्या वृत्तानुसार, २६ वर्षीय शमीयाचे कुटुंब दिल्ली येथे राहते. तिने फरीदाबाद येथील मानव रचना विद्यापीठातून बीटेक (एरोनॉटिकल) पदवी घेतली आहे. ती अमिराती एअरलाईनमध्ये उड्डाण अभियंता आहे. यापूर्वी तिने जेट एअरवेजमध्ये काम केले आहे. शमीयाचे वडील लियाकत अली हरियाणाच्या बीडीपीओच्या पदावरुन सेवानिवृत्त झाले आहेत. तर शामियाचे आजोबा भारत पाकिस्तान फाळणीनंतर भारतातच राहिले. मात्र त्यांचे भाऊ तुफैल पाकिस्तानात निघून गेले.

तुफैल यांचे कुटुंब पाकिस्तानच्या कसूर जिल्ह्यात राहते. त्यांनीच शमीयाचे लग्न हसनबरोबर ठरवले होते. विवाह समारंभात हसन अली खूप मजा करताना दिसला. पाकिस्तानचे पत्रकार सज सादिक यांनी मंगळवारी एक व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “हसन अली आपल्या मेहंदीपूर्वी वाळवंटात सफारी करत आहे. विकेट घेतल्यानंतर तो जसा आनंद साजरा करतो तसाच आनंद साजरा करताना दिसत आहे.” हसननेही त्याच्या ट्विटर अकाऊंटवर स्वतःचे एक छायाचित्रही पोस्ट करत त्यात “बॅचलर म्हणून शेवटची रात्र.” आणि त्यानंतर त्याने मेहंदीच्या रात्रीचाही व्हिडिओ शेअर केला आहे. हसन अलीच्या लग्नासाठी भारतीय क्रिकेटपटूंनाही आमंत्रित करण्यात आले होते. भारतीय क्रिकेटपटूंनी त्याच्या लग्नाला हजेरी लावली होती. तसेच भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झानेही त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. सानिया मिर्झानेही पाकिस्तानी फलंदाज शोएब मलिकशी लग्न केले आहे. हसन अली हा भारतीय मुलीशी लग्न करणारा चौथा पाकिस्तानी क्रिकेटपटू आहे.

आरोग्यविषयक वृत्त –