सानिया मिर्झाचा पती अन् PAK चा माजी कर्णधार शोएब मलिकचा अपघात, ट्रकमध्ये जाऊन घुसली कार (व्हिडीओ)

लाहोर : वृत्तसंस्था – पाकिस्तान क्रिकेट टीमच्या माजी कर्णधाराचा लाहोरमध्ये रविवारी रात्री अपघात झाला. शोएब मलिकची (shoaib malik) कार रस्त्याच्या कडेला उभ्या असणार्‍या ट्रकवर जाऊन आदळली. दुर्घटनेनंतर मलिकच्या कारचे मोठ्याप्रमाणात नुकसान घाले, पण सुदैवाने तो बचावला. शोएब मलिकने भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झासोबत विवाह केला आहे.

शोएब मलिकची स्पोर्ट कार खुप वेगात होती, ज्यामुळे अचानक नियंत्रण सुटल्याने कार ट्रकवर जाऊन आदळली. शोएब मलिक पाकिस्तान सुपर लीगच्या प्लेयर ड्राफ्ट कार्यक्रमातून घरी निघाला होता. दुर्घटना नॅशनल हाय परफॉर्मन्स सेंटरच्या जवळ झाली. दरम्यान, शोएब मलिकने ट्विट करून म्हटले की, तो पूर्णपणे ठिक आहे.

पाकिस्तानी न्यूज चॅनल समा टीव्हीनुसार, शोएब मलिक रेस करण्याच्या नादात या अपघाताला बळी पडला. क्रिकेटर मोहम्मद आमिर आणि बाबर आजम यांनी त्याला स्पोर्ट कार भेट दिली होती.

कार्यक्रमानंतर वहाब रियाज आणि शोएब मलिक आपआपल्या कारने घरी निघाले आणि यादम्यान त्यांच्यात रेस सुरू झाली. रेसच्या दरम्यान ही दुर्घटना झाली. मात्र, अपघातातून सुदैवाने शोएब मलिक बचावला.