‘मुशर्रफ’च नव्हे तर जगातील ‘या’ राष्ट्रपतींना आणि पंतप्रधानांना देखील सुनावण्यात आली होती ‘सजा-ए-मौत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. देशद्रोहाच्या आरोपाखाली मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. परंतु केवळ मुशर्रफच असे नाहीत की ज्यांना राष्ट्रपती असूनही शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. असे अनेक देश आहेत ज्या देशातील राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना फाशीची शिक्षा दिली आहे. जाणून घेऊयात जगातील अशा पंतप्रधान आणि राष्ट्रपतींबद्दल ज्यांना मृत्यू दंडाची शिक्षा दिली गेली आहे.

1) आयन एंटोन्सक्यू , रोमनिया
Ion Antonescu
जन्म 14 जून 1882
ते सैनिक आणि सत्त्वादी राजकारणी होते.
दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी 1940 ते 1944 पर्यंत ते रोमानियाचे पंतप्रधान होते. हुकूमशाहीच्या राजकारणात ते स्वतः पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री आणि सरंक्षण मंत्री पदाचा कारभार पाहत होते. महायुद्धानंतर त्यांना शांती भंग, युद्ध अपराध, देशद्रोह या आरोपांवरून दोषी ठरवत मृत्यू दंडाची शिक्षा सुनावली होती. 1 जून 1946 रोजी सेनेच्या जवानाने फायरिंग करून त्यांना मृत्यू दंडाची शिक्षा दिली.

2) इवान इवानोव बैग्रीआनोव, बल्गेरिया
Ivan Ivanov Bagryanov
जन्म – 17 ऑक्टोबर 1891
बल्गेरिया मधील एक प्रमुख राजकीय नेता होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान ते बल्गेरियाचे पंतप्रधान होते. पश्चिमी देशांच्या विचारधारेचे व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती. रेड आर्मी येण्याआधी बल्गेरियाला युद्धामधून बाहेर काढण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. यासाठी त्यांनी पश्चिमेतील देशांशी बोलणे सुरु केले मात्र यात त्यांना यश आले नाही. त्यानंतर सत्तेवर आलेल्या कम्युनिस्ट सरकारने त्यांना युद्ध दोषी मानत 1 फेब्रुवारी 1945 रोजी फाशीची शिक्षा दिली.

3) जुल्फिकार अली भुट्टो, पाकिस्तान

जन्म – 5 जानेवारी 1928
1973 ते 1977 दरम्यान ते पाकिस्तानचे प्रधानमंत्री होते तर त्याआधी अय्यूब खान यांच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिलेले आहेत. अय्यूब खान यांच्यासोबत मतभेद झाल्याने 1967 मध्ये त्यांनी स्वतःचा नवीन पक्ष (पीपीपी) काढला. 1962 च्या भारत चीन युद्धाच्यावेळी आणि 1965 , 1971 चे पाकिस्तान युद्ध यावेळी ते महत्वाच्या पदांवर होते. 1979 मध्ये पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावरून त्यांना फाशी देण्यात आली. त्यावेळच्या जिया उल हक या दलाशी त्यांचा संबंध आहे असे सांगण्यात आले होते.

4) डोबरी बोझिलोव, बल्गेरिया
Dobri_Bozhilov
जन्म – 13 जून 1884
बल्गेरियाचे 29 वे पंतप्रधान होते. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी त्यांनी जर्मनीसोबत काम केले. युद्धाच्या वेळी जर्मनीने त्यांचा वापर केला असे सांगण्यात येते. यांना देखील कम्युनिस्ट सरकारने युद्ध कारवायांसाठी दोषी करार देत 1945 मध्ये मृत्युदंड दिला.

5) हिदेकी तोजो, जपान
hideki tojo
जन्म – 30 डिसेंबर 1884
जपानचे एक महत्वाचे राजकारणी आणि सैनिक होते. 1960 मध्ये हिदेकी युद्धमंत्री झाले त्यानंतर पुढील वर्षीच त्यांनी पंतप्रधान पदाचा कार्यकाळ सांभाळला. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यामध्ये जापानी सरकार दुर्बल झाले. 1945 मध्ये जपानने औपचारिक आत्मसपर्पण केले. त्यानंतर तोजो यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला परंतु त्यांचा जीव वाचला. यानंतर त्यांना अपराधी समजून त्यांच्यावर कारवाई करत 23 डिसेंबर 1948 रोजी फाशी देण्यात आली.

6) सद्दाम हुसैन, इराक
Saddam Hussain
जन्म – 28 एप्रिल 1937
1957 मध्ये वयाच्या 20 च्या वर्षी सद्दाम यांनी बाथ पार्टीचे सदस्यत्व स्वीकारले. पार्टीमध्ये सद्दाम यांनी सुन्नी गटामध्ये स्वतःला सिद्ध केले आणि आपल्या सोबत एक समूह बनवला. 16 जुलै 1979 रोजी ते स्वतः इराकच्या गादीवर बसले. सद्दाम यांच्यावर हजारो कुर्द, सिया आणि तुर्की मुसलमानांच्या मृत्यूचा आरोप आहे. सद्दाम यांच्या काळात अंदाजे 20 लाख लोकांची हत्या करण्यात आली होती. 5 नोव्हेंबर 2006 रोजी सद्दम हुसेन यांना मृत्यू दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर उत्तरेकडील बगदादच्या भागात एका कॅम्पमध्ये त्यांना फाशी देण्यात आली.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/