अमेरिकेन ब्लॉगर सिंथियाला 15 दिवसात ‘पाक’मध्ये सोडण्याचे निर्देश, माजी पीएमसह अनेक नेत्यांवर केले होते लैंगिक शोषणाचे आरोप

इस्लामाबाद : पाकिस्तानात अनेक राजकीय नेत्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप करणारी अमेरिकेन ब्लॉगर सिंथिया रिची हिचा वीजा वाढवण्यास नकार देण्यात आला आहे. तिला 15 दिवसांच्या आत पाकिस्तान सोडून जाण्यास सांगितले आहे. सिंथियाने म्हटले की, गृह मंत्रालयाने तिचा वीजा वाढवण्याचा निर्णय दबावाखाली घेतला आहे. गृह मंत्रालयाने सिंथियाच्या बाबतीत हा निर्णय इस्लामाबाद हायकोर्टाने सांगितल्यानंतर घेतला आहे, ज्यामध्ये सरकारकडून अमेरिकेन ब्लॉगरच्या राहण्याच्या स्थितीबाबत विचारले होते.

हायकोर्टाने म्हटले होते की, सरकारने सिंथियाच्या बाबतीत लवकर अंतिम निर्णय घेऊन सांगावे की तिला पाकिस्तानमध्ये ठेवायचे किंवा नाही. हायकोर्टचे जस्टिस अतहर मिनाल्लाने हा प्रश्न पाकिस्तान पीपल्स पार्टीचे कार्यकर्ते चौधरी इफ्तिखार अहमद यांच्या याचिकेवर विचारला होता. याचिकेमध्ये सिंथियाच्या राहण्याची स्थितीबाबत माहिती मागितली होती. याच्या उत्तरादाखल सांगण्यात आले की, ती परदेशी नागरिक आहे आणि पाकिस्तानात विजाशिवाय राहात आहे. विचारण्यात आले होते की, ती कोणत्या आधारावर राजकीय वक्तव्य करत आहे. रेडियो पाकिस्तानने म्हटले की, सिंथियाला सांगण्यात आले आहे की, वीजाचा कालावधी वाढवता येणार नाही, यासाठी तिला 15 दिवसाच्या आत पाकिस्तान सोडून जावे लागेल.

सिंथियाने जूनमध्ये फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट करून म्हटले होते की, पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री रहमान मलिक यांनी तिच्यासोबत जबरदस्ती केली होती, तर माजी पंतप्रधान युसूफ रजा गिलानी आणि एका अन्य माजी मंत्र्यांनी तिच्यासोबत छेडछाड केली होती. या लोकांनी हे कृत्य 2011 मध्ये तेव्हा केले होते, जेव्हा ते सरकारी पदावर होते. सिंथियाने म्हटले होते की, माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांनी पाकिस्तानमध्ये वाईटकृत्याची घटना घडवून आणली होती. पर्यटक म्हणून पाकिस्तान आलेली सिंथिया येथे दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून राहात आहे.