नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोनी टीव्हीचा क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती’ हा जगभरातील हिंदी भाषिक लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे. अशातच भारतातील या शो च्या लोकप्रियतेचा फायदा उठवत पाकिस्तानमधील काही लोक बनावट सोशल मीडिया हँडल्सच्या माध्यमातून लोकांना अडकवण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती सुरक्षा संस्थांना मिळाली आहे. संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली.
संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या सुरक्षा सल्ल्यानुसार, “अशी माहिती मिळाली आहे की पाकिस्तानमधील विरोधक कौन बनेगा करोडपतीच्या लोकप्रियतेचा फायदा घेत आहेत आणि व्हॉट्सअॅप ग्रुप बनवून लोकांना त्यामध्ये जोडत आहेत. त्यानंतर बनावट संदेश तयार करून लोकांसाठी सापळा रचत आहेत.”
टाळण्यासाठी हे पर्याय करा :
संरक्षण खात्याच्या या नोटिफिकेशनमध्ये पाकिस्तानचे दोन फोन नंबर देखील लिहिले गेले आहेत. जे एकाच व्हॉट्सअॅप ग्रुपचे अॅडमीन आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या सायबर सेलने लोकांना असा सल्ला दिला आहे की जो कोणी अशा ग्रुपमध्ये सामील होईल त्यांनी तो ग्रुप त्वरित सोडावा आणि अॅड करणाऱ्या नंबरला ब्लॉक करावे. तसेच, अशी सूचनाही देण्यात आली आहे की आपण आपल्या व्हॉट्सअॅप च्या सेटिंगमध्ये बदल करून ज्या व्यक्तीचा नंबर आपल्या फोनमध्ये सेव्ह झाला आहे अशाच ग्रुपमध्ये तुम्हाला जोडले जाऊ शकेल असा पर्याय निवडाल.
Visit :- policenama.com
- रोज १ आवळा खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ ९ चांगले प्रभाव
- नियमित प्या ‘गहू तृणरस’, संधीवातासह ‘हे’ १० आजार होतील दूर, जाणून घ्या
- रात्री उशीखाली ठेवा एक ‘लसणाची पाकळी’ आणि मग पाहा चमत्कार!
- ‘किडनी ट्रांसप्लांट’नंतर अशी घेतली जाते काळजी, निरोगी ठेवण्यासाठी ‘हे’ करा
- ‘या’ १० सौंदर्य समस्या करा दूर, नाही पैशांची आवश्यकता, अवश्य करा ‘हे’ उपाय
- या लोकांनी टाळावे ‘चायनीज फूड’! खात असाल, तर हे आवश्य जाणून घ्या
- प्राचीन उपायांनी वाढवा सौंदर्य, वर्षानुवर्षे होतोय वापर, ‘हे’ १० पदार्थ उपयोगी
- छोटी विलायचीत अनेक औषधी गुणधर्म, होतील ‘हे’ ५ आरोग्यदायी फायदे
- प्रवास करताना उलटी का होते? ‘हे’ ५ उपाय केल्यास मिळेल आराम, जाणून घ्य
- झोपण्यापुर्वी पुरुषांनी प्यावे यापैकी एक ड्रिंक, होतील ‘हे’ ७ खास फायदे
- हे जेवणानंतर खा फक्त दोन चिमुट,आरोग्यसंबंधित होतील अनेक फायदा