#Video : भारत-पाक क्रिकेट मॅचनंतर पाकिस्तानी युवक ‘ढसा-ढसा’ रडला ; म्हणाला, मॅचपुर्वी पाकिस्तानच्या टीमने केलं ‘असं’ काही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – रविवारी (दि. 16 जून) झालेल्या भारत पाकिस्तान वर्ल्डकप मॅचमध्ये भारताने पाकिस्तानचा दारुन पराभव केला. यानंतर क्रिकेटचे अनेक चाहते पाकिस्तानी खेळाडूंवर आपला राग काढताना दिसत आहे. अशातच एक व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत पाकिस्तानी चाहता पाकिस्तान हरल्यामुळे रडताना दिसत आहे. व्हिडीओत दिसत आहे की, चाहता म्हणतोय, “ते (पाकिस्तानी खेळाडू) मॅच खेळायच्या आधी बर्गर खात होते. यांच्याकडून क्रिकेट नाही, तर कुस्ती खेळवली पाहिजे.

आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला 7 वेळा हरवलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानने भारताला ज्या पद्धतीने हरवलं होतं. त्याच अंदाजात कॅप्टन विराट कोहलीने पाकिस्तानचा कॅप्टन सरफराज अहमदकडून बदला घेतला आहे. मॅचमध्ये पाकिस्तानी टीम इंडियन टीम सोबत वाद घालताना दिसून आली.

या मॅचमध्ये पाकिस्तानी टीम खूपच कमजोर दिसून आली. त्यामुळेच मॅच हरल्यानंतर अनेक पाकिस्तानी चाहत्यांच्या डोळ्यात अश्रु दिसून आले. त्यांच्या डोळ्यातील अश्रुच हे सांगत आहेत की, त्यांना आपल्या पाकिस्तानी खेळाडूंकडून किती अपेक्षा होत्या. या चाहत्यांपैकीचा एकाचा रडतानाचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. एका युट्युब चॅनलवरून हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे.

अनेक चाहत्यांनी असे म्हटले आहे की, पाकिस्तानने हरायलाच हवं होतं परंतु चांगली लढत देत हरायला हवं होतं. परंतु त्यांनी खूपच खराब सादरीकरण केलं. यानंतर पाकिस्तानची मॅच पाहण्याची अजिबात इच्छा नाही असे चाहत्यांनी म्हटले आहे.

सिने जगत –

‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी ‘लव्ह’ मॅरेज केल्यानंतर पतीवर केले लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप

‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना ‘सुंदर’ दिसण्यासाठी ‘मेकअप’ची अजिबात नाही गरज

अभिनेत्री प्रियंका चोपडा सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाबाबत मोठं वक्‍तव्य

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ‘भयंकर’ चिडली, ‘त्या’ प्रियकराबाबत केला मोठा खुलासा