‘पाकिस्तान’नं 3 दिवसात डागले 200 ‘मिसाइल’, सीमेवरील लोकांमध्ये ‘भीती’चे वातावरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर भारत पाकिस्तानमधील तणाव वाढत चालचा आहे. पाकिस्तान भेदरलेल्या अवस्थेत दिसून येत आहे. यामुळे पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या शेजारील देशांना पाकिस्तान आता युद्धाची धमकी देत आहे. पाकिस्तानने आता शेजारील देश असलेल्या अफगाणिस्तान – पाकच्या सीमेवर मागील तीन दिवसांपासून २०० मिसाइल डागले आहेत.

पाककडून अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतच्या क्षेत्रात मिसाइल फायर करण्यात आले आहेत. कुनारचे सरकारी प्रवक्ता अब्दुल घानी यांनी ही माहिती दिली. या मिसाइलमुळे परिसरातील घरे पूर्णता उद्ध्वस्त झाली आहेत. यात हल्लात लोक जखमी झाले आहेत की मृत्यूमुखी पडले आहेत याची माहिती अजून स्पष्ट झाली आहे.

सीमेवर मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात येत आहे, यामुळे या परिसरातील लोक घाबरले आहेत. तहरीक – ए -तालिबान ही दहशतवादी संघटना या भागात सक्रीय आहे. पाकिस्तानसाठी ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. मागील अनेक काळापासून पाकिस्तान या दहशतवाद्याची समस्या झेलत आहे.

एकीकडे भारत पाकिस्तान तणाव वाढत असताना दुसरीकडे पाकिस्तान अफगाणिस्तानवर मिसाइल डागत आहे. कुनार भागातील दहशतवादी तळ नेस्तनाबूत करण्यासाठी हे हल्ले करण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like