पाकिस्तानला मोठा ‘झटका’ ! ‘बेस्ट फ्रेन्ड’ चीननं देखील कंगाल PAK ची साथ सोडली, आता पैसे देत नाही

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट झाली आहे. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती झपाट्याने खालावत आहे . अशा परिस्थितीत चीननेही पाकिस्तानची साथ सोडली आहे. त्यामुळे पाकिस्तान आणखीनच आर्थिक अडचणीत सापडला आहे.

पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, चालू आर्थिक वर्ष 2019 -20, जुलै-ऑगस्टमध्ये चीनची पाकिस्तानमधील गुंतवणूक कमी झाली आहे. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण विदेशी गुंतवणूक (FDI) थेट परदेशी गुंतवणूकीत 57.8 टक्क्यांनी घसरून 8.34 कोटी डॉलर्स (जवळपास 592.14 कोटी रुपये) झाली आहे. त्याच वेळी, 2018 च्या आधीच्या वर्षात ते19.79 कोटी डॉलर (सुमारे 1405.09 कोटी रुपये) होते.

चीन पाकिस्तानमधील वेगाने गुंतवणूक घटवत आहे-
स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, चीनने जुलै-ऑगस्टमध्ये केवळ 2.89 कोटी डॉलर्स (सुमारे 205.19 कोटी) रुपयांची गुंतवणूक केली. 2018 मध्ये या एकूण 21.6 डॉलर (सुमारे 1533.6 कोटी रुपये) गुंतवणूक केली होती. जागतिक बँकेची मदत घेण्यापूर्वी चीनने पाकिस्तानी अर्थव्यवस्था सावरण्यासाठी कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक केली.

काश्मीरप्रश्नी चर्चा नाहीच –
जम्मू-काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांव्यतिरिक्त इतर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तानने उपस्थित केला आहे, पण कोणीही त्याचे समर्थन करत नाही. त्याचा जवळचा मित्र चीनसुद्धा या प्रकरणात उघडपणे बोलत नाही. पुढील काही दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची एका परिषदेत बैठक होणार आहे. परंतु असे बोलले जात आहे की हे दोन्ही नेते काश्मीरच्या मुद्यावर चर्चा करणार नाहीत.

Visit – policenama.com 

Loading...
You might also like