पाकिस्तानात काश्मीर समितीच्या पहिल्या बैठकीत भारताला आव्हान देण्यासाठी ‘रोडमॅप’वर चर्चा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी स्थापन केलेल्या काश्मीर समितीची शनिवारी पहिली बैठक झाली. या समितीत सात सदस्य आहेत. जम्मू-काश्मीरसंदर्भात कलम 370 मधील महत्त्वाच्या तरतुदी हटविण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतल्यानंतर ६ ऑगस्ट रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ही समिती बनवली होती.

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक झाली. समितीच्या अन्य सदस्यांमध्ये आयएसआयचे प्रमुख जनरल फैज हमीद, मेजर जनरल असिफ घफूर, कायदामंत्री नसीम, पंतप्रधान इम्रान खानचे विशेष सल्लागार फिरदौस आशिक, अ‍ॅटर्नी जनरल अन्वर मन्सूर खान यांचा समावेश आहे.

या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी म्हणाले की, आज (शनिवार) ही काश्मीर समितीची पहिली बैठक होती. या समितीत पाकिस्तानच्या सर्व संस्थांचे प्रतिनिधित्व असल्याने ही बैठक विशेष आहे. आम्ही संसदेत एकता दर्शविली होती आणि आजच्या या बैठकीत आम्ही प्रतिकात्मक पद्धतीने एकत्र आलो आहोत.

त्यांनी पुढे सांगितले की, काश्मीर समितीच्या पहिल्या बैठकीत भारताविरूद्ध पुढील लढा देण्यासाठी रोडमॅप तयार करण्याचा प्रयत्न केला. संसदेच्या संयुक्त अधिवेशनात पारित केलेला ठराव काश्मीर समितीच्या बैठकीत ठेवण्यात आला. UNSC मध्ये काश्मीर प्रश्नावर चर्चेचा मुद्दाही बैठकीत उपस्थित झाला.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like