PAK चे माजी गृहमंत्री रहमान मलिक यांनी केला होता ‘रेप,’ अमेरिकन महिलेचा आरोप

नवी दिल्ली : वृत्त संस्था – अमेरिकेतील एक महिला सिंथिया डी रिची हिने पाकिस्तानचे माजी गृहमंत्री रहमान मलिक यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. सिंथियाचा दावा आहे की, तिच्यावर बलात्काराची घटना 2011 मध्ये झाली होती. सिंथियाने पाकिस्तानचे माजी पंतप्रधान युसुफ रजा गिलानी आणि तत्कालीन आरोग्य मंत्री मखदूम शहाबुद्दीन यांच्यावर सुद्धा शारीरीक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे, जेव्हा ती राष्ट्रपती भवनात थांबली होती.

सिंथियाने म्हटले की ही घटना हमानी यांच्या घरी घडली होती. अमेरिकन महिलेने दावा केला आहे की, तेव्हा ती रहमानी यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेली होती. जेथे तिला फुले आणि ड्रिंक देण्यात आले होते. तिला वाटले की, ही मिटींग तिच्या विजासाठी आहे. तेव्हा तुम्ही शांत का बसलात, असे विचारले असता सिंथियाने म्हटले की, पीपीपीचे सरकार होते आणि त्यांनी मला सहकार्य केले नसते.

अमेरिकन महिलेन हा सुद्धा दावा केला आहे की, तेव्हा तिने अमेरिकी दूतावासात सुद्धा कुणाला तरी आपल्या सोबत घडलेल्या घटनेविषयी सांगितले होते. परंतु, तसा प्रतिसाद मिळाला नाही, जसा मिळायला हवा होता. काही दिवसांपूर्वी कुठुंबावर हल्ला झाल्याचा आरोप करत तिने म्हटले की, ती कोणत्याही आरोपीला तोंड देण्यास मी तयार आहे.

सिंथियाने, केलेल्या आरोपाबाबत साक्ष असल्याचा दावा करत चौकशीची मागणी केली आहे. सिंथियाने म्हटले की, झरदारींच्या घाणेरड्या पीपीपीकडून मला सतत धमकावले जात होते. कारण त्यांना माहिती आहे की, पार्टीच्या महत्वाच्या पदावर राहिलेल्या नेत्यांनी माझ्यावर बलात्कार केला आहे.

स्वत: अ‍ॅडव्हेंचरिस्ट, फिल्म निर्माता असल्याचा दावा करणारी सिंथिया सोशल मीडियावर आपले पाकिस्तान प्रेम उघडपणे जाहीर करत आहे. ती मागच्या काही दिवसांपासून पीपीपी नेत्यांचे फोटो पोस्ट करून सतत आरोप करत आहे. बेनझीर भुट्टो यांच्या बाबत केलेल्या एका ट्विटनंतर पीपीपी पक्षाने सिंथियाविरूद्ध एफआयआरसुद्धा दाखल केली होती.