इम्रान खानची डोकेदुखी वाढणार, जनरल मुशर्रफ करणार पाकच्या राजकारणात एन्ट्री

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – प्रकृती अस्वस्थामुळे गेल्या एक वर्षापासून राजकारणापासून दूर असलेले पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख परवेझ मुशर्रफ आपल्या पक्षाला पुनर्जीवित करण्यासाठी राजकारणात परतणार आहेत. आधीच संकटांनी घेरलेले इम्रान खानसमोर एक नवीन आव्हान निर्माण होईल हे उघड आहे. जनरल (सेवानिवृत्त) परवेझ मुशर्रफ हे 2016 पासून दुबईत राहत आहेत. 2007 साली घटना स्थगित केल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला सुरू आहे. या गुन्ह्यासाठी त्याला 2014 मध्ये दोषी ठरविण्यात आले होते. देशद्रोहचा गुन्हा दाखल झाल्यास फाशीची शिक्षा किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजकारणापासून दूर होते
ऑल पाकिस्तान मुस्लिम लीगचे (एपीएमएल) संस्थापक परवेझ मुशर्रफ हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या वर्षांपासून सक्रिय राजकारणातून दूर आहेत.
पक्षाच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने ते रविवारी इस्लामाबादमध्ये आपल्या समर्थकांना व्हिडिओ लिंकद्वारे संबोधित करतील.

एपीएमएलचे सरचिटणीस मेहरीन मलिक यांनी शुक्रवारी सांगितले की, माजी राष्ट्रपतींवर गेल्या महिन्यात 12 दिवस लंडनमधील रूग्णालयात उपचार सुरू होते. ते आता बरे आहेत आणि दुबईतील आपल्या निवासस्थानी परतले आहेत.

दुर्मिळ आजाराचे कारण सांगून कोर्टात हजर राहिले नाही –
मुशर्रफ यांना पाकिस्तानच्या विशेष कोर्टाने समन्स बजावले होते. पण ते कोर्टात हजर झाले नाहीत. कोर्टात हजर राहणे टाळण्यासाठी मुशर्रफ यांनी त्यांच्या दुर्मिळ आजाराचा हवाला देत असमर्थता व्यक्त केली. यानंतर पाकिस्तानी कोर्टाने मुशर्रफ यांना फरारी घोषित केले. त्यांनतर पाकिस्तानी कोर्टाने म्हटले होते की मुशर्रफ यांच्या अनुपस्थितीत खटला चालविला जावा.

Visit : Policenama.com