कारगिल युद्ध : नवाझ शरीफ यांचा आणखी एक गौप्यस्फोट

क्वेटा : वृत्तसंस्था – पाकिस्तान (pakistan) सरकार विरोधात विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. विरोधी पक्षांच्या ‘पाकिस्तान डेमोक्रेटीक मुव्हमेंट’च्या वतीने (PDM) क्वेटामध्ये तिसरी जाहीर सभा पार पडली. या सभेत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे सहभागी झालेले माजी पंतप्रधान नवाझ शरीफ (former pm nawaz sharif) यांनी कारगिल युद्धाबाबत (kargil war) खुलासा करताना आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. कारगिलचे युद्ध पाकिस्तानी सैन्याने नव्हे तर काही मोजक्या अधिकाऱ्यांनी लादले होते. या युद्धासाठी पाकिस्तानी सैन्याकडे (soldiers) शस्त्रेदखील (weapons) नव्हते, असे शरीफ यांनी म्हटले आहे.

कृत्य लपवण्यासाठी मार्शल लॉची घोषणा

नवाझ शरीफ हे लंडनहून व्हिडीओ लिंकद्वारे सभेमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी पाकिस्तान सरकार आणि लष्करी हुकूमशाहीवर जोरदार टीका केली. शरीफ म्हणाले की, कारगिल युद्धात पाकिस्तानचे अनेक जवान ठार झाले. संपूर्ण जगासमोर पाकिस्तानची यामुळे नाचक्की झाली. यासाठी सैन्यातील काही मोठे अधिकारीच जबाबदार होते. या मोजक्या लोकांनी फक्त सैन्यालाच नाही तर संपूर्ण देशालाच युद्धात ढकलले. यामुळे काहीच मिळाले नाही. पाकिस्तानच्या सैन्याला पुरेसे अन्नही मिळाले नव्हते. पाकिस्तानच्या या काही मोजक्या अधिकाऱ्यांनी आपले कृत्य लपवण्यासाठी आणि शिक्षेपासून वाचण्यासाठी मार्शल लॉ घोषित केला. परवेझ मुशर्रफ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वैयक्तिक फायद्यासाठी सैन्याचा वापर केल्याची टीका शरीफ यांनी केली.

आयएसआय प्रमुख हमीदवर टीका

पाकिस्तानचे लष्कर प्रमुख बाजवा आणि आयएसआय प्रमुख हमीद यांच्यावर देखील शरीफ यांनी टीका केली. पाकिस्तानच्या सध्याच्या वाईट परिस्थितीसाठी हे दोघेच जबाबदार असल्याचा आरोप शरीफ यांनी केला आहे. शरीफ यांनी सांगितले की, 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीतील गोंधळ आणि इतर बाबींवर या दोघांनाही उत्तर द्यावेच लागणार आहे. शरीफ यांनी जावई निवृत्त कॅप्टन मोहम्मद सफदर यांच्या अटकेवरुनही सरकारवर टीकास्त्र सोडले. कोणाच्या इशाऱ्यावरुन सफदर यांना अटक झाली असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

पाकिस्तानी सैन्याने घुसखोरी केली

भारताचे तात्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पाकिस्तानचे तात्कालिन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी दोन्ही देशांदरम्यान शांतता प्रस्तावावर चर्चा सुरु केली होति. पंतप्रधान वाजपेयी यांनी दिल्ली-लाहोर बस सेवाही सुरु केली होती. मात्र, त्यानंतर काही महिन्यातच पाकिस्तानच्या सैन्याने घुसखोरी करत भारताच्या हद्दीतील काही कारगिल, द्रास आदी सेक्टरमध्ये महत्त्वाच्या ठिकाणावर ताबा मिळवला होता. मात्र, भारताच्या सैन्याने पराक्रम गाजवत पाकिस्तानी सैन्याला या युद्धात धूळ चारल्याचे शरीफ यांनी सांगितले.

You might also like