कारमधून ओढून मुलांसमोर विदेशी महिलेवर सामुहिक बलात्कार, पाकिस्तानात खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुलांसमोरच एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेनंतर पाकिस्तानमध्ये लोकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. या घटनेचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने घटनेसाठी महिलेलाच जबाबदार धरण्याचा प्रयत्न केला आहे. पीडित महिला फ्रान्सची रहिवासी आहे. तसेच काही दिवसापूर्वी कराचीमध्ये एका ५ वर्षाच्या मुलीचे अपहरण करण्यात आले होते आणि त्यानंतर बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आली होती.

बलात्काराची नवी घटना लाहोरजवळची आहे. फ्रान्समधील महिला स्वत: गाडी चालवत होती. महामार्गावरून जाताना गाडी बंद पडली. दुपारी १.३० वाजता तेथे किमान २ जण पोचले आणि त्यांनी कारची खिडकी तोडून महिलेला आणि तिच्या दोन्ही मुलांना ओढले. मुलांसमोरच अनेकदा महिलेवर बलात्कार केला गेला. गुन्हेगारांनी महिलेचे दागिने, रोख रक्कम आणि बँक कार्डही लुटले.

असे सांगितले जात आहे की, कारमध्ये तेल संपल्यानंतर महिलेने पोलिसांना फोन केला होता आणि मदतीची वाट पहात होती. या प्रकरणात १५ लोकांना अटक करण्यात आली आहे. या घटनेबाबत लोक पाकिस्तानात रस्त्यावर उतरले आहेत. प्रशासनाच्या विरोधात आणखी बरीच निदर्शने करण्यात येत आहेत.

या प्रकरणातील मुख्य तपासनीस आणि पोलिस अधिकारी ओमर शेख यांनी रात्री एकाकी प्रवास करण्याऐवजी त्या महिलेने संपूर्ण माहिती ठेवली पाहिजे होती, असे सांगून लोकांचा संताप वाढवला. शेख म्हणाले की, पाकिस्तानी समाजातील कोणीही आपल्या बहिणीला आणि मुलीला इतक्या रात्री एकट्याने प्रवास करण्याची परवानगी देणार नाही. शेख असेही म्हणाले की, तिने सुरक्षित महामार्ग वापरायला पाहिजे होता आणि प्रवासादरम्यान गाडीत पुरेसे इंधन ठेवले पाहिजे होते. ते असेही म्हणाले की, महिलेने पाकिस्तानी समाजाला सुरक्षित समजले.

अधिकाऱ्यांच्या विधानावर लोक संतापले आणि म्हणाले की, पीडितेलाच दोष देण्याचे आणखी एक उदाहरण आहे. पाकिस्तानमध्ये बर्‍याच वेळा असे घडते की, तक्रार करणार्‍या महिलेलाच गुन्हेगार म्हटले जाते. त्याचबरोबर मानवाधिकार मंत्री शीरीन मझारी यांनी म्हटले की, पोलिस अधिकाऱ्यांची टिपण्णी अस्वीकार्य आहे. त्यांनी म्हटले की, बलात्काराची घटना कधीही तर्कसंगत ठरवली जाऊ शकत नाही. महिला हक्कांसाठी काम करणार्‍या कार्यकर्त्यांनी पोलिस अधिकारी उमर शेख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.