काश्मीरच्या मुद्यावर PAK च्या विश्वासू मित्राची देखील भारताला ‘साथ’, इम्रान खान म्हणाले – ‘आता मुस्लिम देश देखील’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानला आता काश्मीर मुद्यावर त्यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या सौदी अरबची देखील साथ मिळताना दिसत नाही. काही वृत्तानुसार सौदी अरब काश्मीर मुद्यावर इस्लामिक सहयोग संघटन (ओआयसी) ची परराष्ट्रीय मंत्र्यांच्या स्तरावर बैठक बोलावण्यास तयार नाही. 9 फेब्रुवारीला ओआयसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्तरावर बैठक होईल.

ओआयसीकडून काश्मीर मुद्यावर बैठक बोलावण्यास असमर्थता दाखवण्यात आल्याने इस्लामाबादकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. मलेशिया दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी ओआयसीवर आपला राग व्यक्त केला. ते म्हणाले की हेच कारण आहे की आपला आवाज नाही आणि आपण विभागलो गेलो आहोत. ओआयसीने काश्मीर मुद्यावर एक बैठक देखील बोलावली नाही.

पाकिस्तान सौदीच्या नेतृत्वात 57 सदस्य देश असलेली संघटना ओआयसीवर काश्मीर मुद्यावर बैठक बोलावण्यावर दबाव आणला परंतु सौदीने या मागणीकडे दुर्लक्ष केले. डिसेंबर महिन्यात ओआयसीच्या स्वतंत्र स्थायी मानवाधिकार आयोगाने काश्मीरमध्ये कथित मानवधिकार उल्लंघन संबंधित एक अहवाल सोपावला होता. परराष्ट्र मंत्रालयाच्या स्थरीय बैठकीच्या दिशेत कोणताही प्रगती झालेली नाही.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री महमूद कुरैशी यांनी ओआयसीच्या बैठकीवर बोलताना सांगितले की काश्मीर मुद्यावर मुसलमानांची एकजुटता दाखवण्यासाठी हे अत्यंत महत्वाचे होते. तर इमरान खान म्हणाले की दर भेदभाव धर्माच्या आधारे होत आहे तर मुस्लिमांना धर्माच्या आधारे एकजुठ व्हायला हवे.

ओआयसीमध्ये कोणत्याही कामकाजासाठी सौदीचे समर्थन अत्यंत महत्वाचे आहे कारण संघटनेत सौदी आणि त्यांच्या सहयोगी देशांचा दबदबा आहे. सौदी अरब भारताशी असलेल्या आर्थिक आणि राजकीय धोरणांना पाहता काश्मीरवर ओआयसीची बैठक बोलावण्याबाबत सकारात्मक नाही. यासाठी सौदींनी पाकिस्तानला अनेक प्रस्ताव देखील दिले ज्यात मुस्लिम देशांची एक कॉन्फ्रेंस करणे किंवा काश्मीर फिलिस्तीनच्या मुद्द्यावर एक बैठक घेणे सहभागी आहे. पाकिस्तान ओआयसीच्या सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या बैठकीसाठी अडून आहे.

इस्लामाबादचे म्हणणे आहे कॉन्फ्रेंस काश्मीर मुद्याची गंभीरता पाहून पर्याप्त नाही. या फोरमच्या वापर रियाद इराणच्या विरोधात घोषणाबाजी करु शकतात कारण सौदीच्या बाजूने स्पीकर डॉ. अब्दुल्ला बिन मोहम्मद बिन इब्राहिम अल शेख यांची आपल्या अनेक समकक्षांसह मजबूत लॉबी आहे.

सौदी अरबने काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याच्या विरोधात पाकिस्तानच्या समर्थनात नाही. तुर्की, मलेशिया आणि इराणने भले की काश्मीर मुद्यावर चिंता व्यक्त केली परंतु सौदी या मुद्यापासून दूर राहू इच्छीत आहे. पाकिस्तानचे चिंता ही देखील आहे की फिलिस्तीन मुद्द्यासह चर्चा करुन कश्मीर मुद्याला प्राथमिकता मिळणार नाही.

मागील काही दिवसांपासून पाकिस्तान, मलेशिया आणि तुर्कीसह मिळून मुस्लिम देशांची वेगळे संघटन उभारण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु सौदीने नकार दिल्याने इमरान खानने मलेशियाच्या कुआलालंपूर समिटमध्ये सहभाग घेतला नाही.

सौदीचे परराष्ट्र मंत्री फैसल बिन फरहान यांनी पाक परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांच्यासह मुलाखतीत ओआयसी बैठक बोलवण्याचे संकेत दिले होते. सौदीचे परराष्ट्र मंत्री मलेशिया समिटपासून दूर बनवण्यासाठी पाकिस्तानला धन्यवाद देण्यासाठी पोहचले होते. परंतु पाकिस्तान या संधीचा फायदा घेण्यापासून राहिला, त्यांना भीती होती की तात्काळ बैठक बोलावल्यास असे वाटेल की मलेशिया समिट पासून दूर राहण्यासाठी सौदीने त्यांना बक्षिस दिले आहे.

इराणचे जनरल कमांडर कासिम सुलेमानी यांच्या हत्येनंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी सौदी अरबच्या दौऱ्यावर गेले होते.यावेळी देखील त्यांनी मुस्लिम देशांच्या बैठकीची मागणी केली होती. असे असले तर त्यांना सकारात्मक उत्तर मिळले नाही. कुरैशी यांनी नुकतेच सांगितले की सौदी त्यांना निराश करणार नाही. ओआयसीच्या 47 व्या नियमित बैठक तयार झालेली आहे. या बैठकीत नेहमी प्रमाणे काश्मीरचा प्रस्ताव सहभाग असेल परंतु वेगळा प्रस्ताव ठेवला जाणार नाही.