अखेर पाकिस्तानची ‘मस्ती’ जिरली, भारताकडून घेतली ‘मदत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधून कलम 370 काढून घेतल्यानंतर पाकिस्तानने भारतासोबतचे सर्व व्यावसायिक संबंध तोडले होते. परंतु आता यानंतर पाकिस्तानने भारताकडे मदत मागितली आहे. याच कारणास्तव पाकिस्तानने आता भारताकडून पोलिओ मार्कर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानला हा निर्णय घ्यावा लागला कारण इतर देशांच्या मानाने भारतातून आयात करण्यासाठी पाकिस्तानला कमी खर्च लागेल.

इम्रान खान यांच्या कॅबिनेटने भारतातून पोलिओ मार्करच्या आयातीसाठी आरोग्य विभागाला एकदाच परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. कारण यामध्ये 89 औषधांच्या किमतीमध्ये 15 % दर कमी होणार आहे.
पाकिस्तान की अकड़ पड़ी ढीली, भारत से पोलियो मार्कर लेने पर हुआ मजबूर
या निर्णयानंतर पाकिस्तानमध्ये आपत्कालीन संचालन केंद्राच्या राष्ट्रीय समन्वयक डॉ. राणा सफदर यांनी सांगितले की, 2018 मध्ये ठरवण्यात आलेले दर त्यानुसार 89 औषधांच्या किमती कमी करण्यात आलेल्या आहेत. सगळ्या गोष्टींबाबत विचार करून पोलिओचा दर कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे डॉ राणा यांनी सांगितले.

WHO द्वारे निर्धारित करण्यात आलेल्या नुसार मुलांना पोलिओचा डोस दिल्यानंतर मार्करचा उपयोग केला जातो. भारत आणि चीनमधील केवळ दोनच लोक डब्ल्यूएचओच्या मानक नुसार उत्पादक आहेत, डॉ. राणा सफदर म्हणाले की, डब्ल्यूएचओ आमच्यासाठी मार्कर खरेदी करतो आणि यापूर्वी संस्थेच्या वतीने चीनकडून मार्कर खरेदी केले गेले होते, तेव्हा मार्करच्या गुणवत्तेत समस्या होती.

त्यांनी सांगितले की, डब्ल्यूएचओने भारतातून खरेदी सुरु केली होती आणि बंदीच्या घोषणेआधी निर्मात्यांना 800,000 मार्करच्या निर्मितीचे आदेश दिले होते. परंतु स्टॉक वितरित करण्यात आला नाही. परंतु आता ही बंदी उठवल्यानं आम्हाला मार्कर मिळतील अशी अशा राणा यांनी व्यक्त केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/