LOC वर पाकिस्तानचा ‘पॅकेज गेम’, महिलांसाठी केली ‘ही’ नवी घोषणा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – नियंत्रण रेषेवर (LOC) पाकिस्तान नवीन डावपेच आजमावत आहे. एका नवीन कार्यक्रमाअंतर्गत पाकिस्तानने नियंत्रण रेषेजवळ राहणाऱ्या लोकांसाठी ‘अहसास कार्यक्रम’ जाहीर केला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या माहिती व प्रसारण विषयक विशेष सल्लागार डॉ. फिरदौस आशिक अवान यांनी गुरुवारी या संदर्भात माहिती दिली

त्यांनी संगितले कि, फेडरल मंत्रिमंडळाने नियंत्रण रेषेजवळ राहणाऱ्या कुटुंबांसाठी विशेष पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेज अंतर्गत रेशन योजना तयार केली गेली आहे. ज्यामध्ये एलओसी जवळील 33,498 कुटुंबातील प्रत्येक विवाहित महिलेला दर तीन महिन्यात पाच हजार रुपये दिले जाईल आणि ही प्रक्रिया चार वेळा केली जाईल.

मिळालेल्या माहितीनुसार, अवान यांनी ट्वीट केले की, ‘मातृभूमीच्या रक्षणासाठी एलओसीवर राहणारे शूर लोक सशस्त्र दलांच्या बाजूने शत्रूचा सामना करत आहेत. त्यांच्या बलिदानास आम्ही सलाम करतो. इतकेच नाही तर फिरदौस आशिक अवान यांनी भारतीय सैन्य दलाद्वारे नियंत्रण रेषेवरील युद्धबंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/