पाकिस्तानच्या वेबसाईटवर ‘हिंदुस्थान झिंदाबाद’ ; ‘बिग बी’चे ट्विटर हॅण्डल हॅक केल्याचा ‘ठासून’ घेतला ‘बदला’

मुंबई : वृत्तसंस्था – ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाउंट हॅक करणे पाकिस्तानला चांगलेच महागात पडले आहे. इंडियन सायबर सोल्जर’ कडून पाकिस्तानच्या पाच वेबसाईट हॅक करून हा बदला घेण्यात आला आहे. पाकिस्तानच्या या वेबसाईटवर हिंदुस्थान झिंदाबाद’ चा नारा झळकला आहे.

असा’ घेतला बदला
भारतीय हॅकर्सनी पाकिस्तानच्या पाच वेबसाईट हॅक केल्या आहेत. पाकिस्तानच्या ज्या वेबसाईट हॅक करण्यात आल्या आहेत त्या वेबसाईटवर अमिताभ बच्चन यांचा फोटो आणि भारतीय तिरंगी झेंड्याचा फोटो दिसून येत आहे. वेबसाईटवर जाताच वंदे मातरम गाण्याचे बोल ऐकू येत आहेत. वेबसाईटवर ‘हिंदुस्थान झिंदाबाद’ असा नारा दिसत आहे. तसेच वेबसाईटवर ‘इंडियन सायबर सोल्जर’ असे नाव दिसत आहे.

‘बिग बीं’चे ट्विटर हॅण्डल केले होते हॅक
पाकिस्तानी हॅकर्सनी अमिताभ बच्चन यांच्या फोटोच्या जागी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो लावला होता. अमिताभ बच्चन यांच्या नंतर पाकिस्तानी गायक आणि सध्या भारतीय नागरिक असलेल्या अदनान सामीचे देखील ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले होते. बिग बींचे ट्विटर अकाउंट पाकिस्तानी हॅकर्सनी हॅक केल्यामुळे भारतीय हॅकर्स अशाप्रकारचा बदला घेण्याची शक्यता होती. अखेर ही शक्यता खरी ठरली आहे. पाकिस्तानच्या तब्बल पाच वेबसाईट हॅक केल्यामुळे भारतीय हॅकर्सनी पाकिस्तानी हॅकर्सला सडेतोड उत्तर दिले आहे.