भारताच्या आक्रमकतेने पाकिस्तानची ‘टरकली’ ; अतिरेकी हाफीज सईदला नमाजाच्या नेतृत्त्वापासून ठेवलं ‘वंचित’

लाहोर : वृत्तसंस्था – भारताने अतिरेकी कारवायांविरोधात घेतलेल्या आक्रमक पवित्र्याने पाकिस्तानही भयभीत झाला आहे. याची प्रचीती काल आली. लाहोर येथील ईदनिमित्ताने घेतलेल्या नमाजाचे नेतृत्त्व मुंबई हल्ल्याचा मास्टर मांइड आणि जमात उद दावा संघटनेचा म्होरक्या अतिरेकी हाफिज सईदला करू दिले नाही. मागील अनेक वर्षांपासून हाफिज सईद कद्दाफी स्टेडियमवरील नामाजाचे नेतृत्त्व करतो. मात्र यंदा त्याला ही संधी दिली नाही.

सईदला लाहोर येथील नमाजाचे नेतृत्त्व करू न दिल्याने त्याने त्याच्या घराजवळील स्थानिक मशीदीत जाऊन नमाज पठण केले. सईदला कद्दाफी स्टेडियमला नमाजाचे नेतृत्त्व करायचे होते. मात्र त्याच्या एक दिवस आधी पंजाब सरकारच्या एका अधिकाऱ्याने असं न करण्यास सांगितलं. जर त्याने नामाजाचे नेतृत्त्व केले तर सरकार त्याला अटक करू शकते, असं या अधिकाऱ्याने सांगितलं होते. सरकारच्या निर्देशानंतर सईदकडे कोणताही पर्याय नव्हता, म्हणून त्याने त्याच्या घराजवळील स्थानिक मशीदीतच नमाज केला.

सईद कद्दाफी स्टेडियममध्ये अनेक वर्षांपासून बकरी ईद आणि ईदच्या नमाजाचे नेतृत्त्व करत आला आहे. त्यावेळी सरकराकडून त्याला पुरेपूर सुरक्षा दिली जायची. तेव्हा नमाजाचे नेतृत्त्व करताना तो लोकांना धार्मिक मुद्द्यांवरून भडकवण्यासारखे भाषणं करायचा. तसंच काश्मिरबद्द्ल त्याची मते खुलेआम मांडायचा. शिवाय यावर सरकार कोणता आक्षेपही घेत नव्हती. मात्र २००८च्या मुंबई हल्ल्यानंतर त्याच्या संघटनेला आणि त्याला संयुक्त राष्ट्राने अतिरेकी म्हणून घोषित केले आहे. या हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, मोदी सरकार पुन्हा सत्तेत आल्याने पाकिस्तानमधील अतिरेक्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. त्यामुळे मोदी सरकार आणि गृहमंत्री अमित शहा यांची भिती ही सध्या सर्वत्र दिसत आहे.