पाकीस्तान ३६० भारतीय कैद्यांना सोडणार ; मराठी, गुजराती मच्छिमारांचा समावेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानकडून ३६० भारतीय कैद्यांची सुटका करण्यात येणार आहे. मानवतेच्या आधारावर त्यांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कैद्यांना सोमवारी (८ एप्रिल) भारताच्या स्वाधिन केले जाईल असे पाकिस्तानकडून सांगण्यात आले आहे. त्याबाबतचे ट्विट एएनआय या वृत्तसंस्थेने केले आहे.
https://twitter.com/ANI/status/1114166304691240961
एकून चार टप्प्यामध्ये या कैद्यांची सुटका केली जाणार आहे. प्रत्येक टप्प्यात १०० कैद्यांना सोडण्यात येणार आहे. सुरुवातील या सोमवारी १०० कैद्यांना भारताच्या हवाली केले जाणार आहे. त्यानंतर १४, २१ व २८ एप्रिलला इतर कैद्याना भारताच्या हवाली केले जाईल.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तान उच्चायुक्तालयाला ३८५ भारतीय मच्छिमारांना सोडण्याची मागणी केली होती. यानंतर पाकिस्तानने हा निर्णय घेतला आहे. या कैद्यांमध्ये मराठी तसेच गुजराती मच्छिमार, नागरिकांचा समावेश आहे. समुद्रात चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेलेल्यांचा यामध्ये समावेश आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. त्या पार्श्वभूमिवर भारतीय कैद्यांना सोडण्याच्या निर्णय महत्वाचा मानला जात आहे.