‘एअर स्ट्राइक’ नंतर देखील सुधरला नाही पाकिस्तान, पुलवामाची पुनरावृत्ती करण्यासाठी रचला 16 वेळा ‘कट’

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – पुलवामा येथील झालेल्या हल्ल्याला भारताने बालाकोट येथे एअर स्ट्राइक करून चोख प्रतिउत्तर दिले होते मात्र त्यानंतर देखील पाकिस्तानला अक्कल आलेली नाही कारण गेल्या काही दिवसांमध्ये पाकव्याप्त काश्मीरमधून सोळा वेळा पुलावामची पुनरावृत्ती करण्यासाठी प्रयत्न केले गेले आहेत. यासाठी दहशतवाद्यांनी अनेकदा आयडी द्वारे स्फोट घडवण्याचे देखील प्रयत्न केले. मात्र सीआरपीएफने हे सर्व प्रयत्न हाणून पाडले आहेत.

कधी आणि केव्हा केला प्रयत्न
10 मार्च 2019 : जम्मूमधील खोड परिसरात पलांवाला रस्त्यावर डब्यामध्ये आयईडी लावण्यात आले.

30 मार्च : बनिहाल जवळ सीआरपीएफच्या ताफ्यावर पुलवामा प्रमाणे कारणे धडक देण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु नशिबाने कारमध्ये असलेली स्फोटके फुटली नाही.

जून 2019 : सेनेच्या 44 आरआर ताफ्यावर शोपियांमध्ये आयईडी लावलेल्या वाहनाद्वारे हल्ला करण्यात आला यामध्ये दोन जावं शहिद झाले आणि नऊ जवान जखमी झाले होते.

26 नवंबर : अनंतनागमध्ये बॅक टू विलेज कार्यक्रमात आयडी लावून धमाका केला. यामध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला.

नवंबर 2019 : काजीगुंडमध्ये प्रेशर कुकरमध्ये दोन आयडी जप्त करण्यात आले. सेनेच्या पेट्रोलिंग जवानांवर हल्ला करण्याचा प्रयत्न होता.

19 नवंबर 2019 : पुंछ हायवेवर आयडी जप्त केले.

31 जनवरी 2019 : नगरोटा येथील हायवेजवळ खूप मोठे आयडी जप्त करण्यात आले.

पुन्हा तसाच प्रयत्न
2018 मध्ये काश्मीरमध्ये आयईडी स्फोटातून 8 हल्ले झाले होते. 2019 मध्ये हे हल्ले दुपटीने वाढले. पुलवामा हल्ल्यानंतरही 15 ते 16 हल्ले झाले. जम्मूव्यतिरिक्त बनिहाल, राजोरी, पुंछ, अखनूर आणि जम्मू भागात आयईडी लावून दहशतवाद्यांनी पुलवामासारखे हल्ले पुन्हा करण्याचा प्रयत्न केला.

पाच दहशतवादी ठार मात्र सूत्रधार अजूनही जिवंत
पुलवामा हल्ला घडवून आणणारे पाचही दहशतवादी ठार झाले असले तरी जैशेचा म्होरक्या मसूद अजहर अद्याप पाकिस्तानात जिवंत आहे. एनआए कडून आणखी तपास केला जात आहे जेणेकरून यामध्ये आणखी कोणाचा हात असेल तर त्त्याची माहिती मिळावी.

अदिलच्या आई वडिलांचे घेतले होते डीएनए सॅम्पल
एनआयएने आदिलच्या वडिलांचा डीएनए नमुना घेतला होता. ज्यामध्ये हे सिद्ध झाले की हल्ला आदिलने केला होता. एनआयएने घटनास्थळावरून आदिलच्या शरीरावर रक्ताचे डाग, मांसाचे नमुने घेतले. हा नमुना वडिलांशी जुळला. एनआयएने पाच दहशतवाद्यांना ठार केले होते, परंतु पाकिस्तानशी झालेल्या हल्ल्याची लिंक अद्याप प्रस्थापित झालेले नाहीत.

कसे बंद होणार नाही,नवीन लिंकच्या प्रतीक्षेत
एनआयएच्या एका उच्च अधिकाऱ्याने सांगितले की यातील पाच दहशतवाद्यांना ठार केले असले तरी याबाबतचे इतर कनेक्शन देखील तपासले जात आहे. ज्यावेळी याविषयी ठोस पुरावा मिळेल तेव्हा यावर कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले आहे.

मसूदला आरोपी बनवण्याची तयारी
एनआयए मसूदला पुलवामा हल्ल्यातील मुख्य आरोपी बनवू शकते मिळालेल्या माहितीनुसार कटाच्या पूर्ण प्लॅनिंगचा अद्याप उलगडा होऊ शकलेला नाही. एनआयए कडून यासंबंधी अनेकांची ओळख पटवून घेण्यात आली आहे. त्यामुळे मसूदला यातील मुख्य आरोपी केले जाऊ शकते कारण पठाणकोट हल्ल्यामध्ये देखील असेच करण्यात आले होते.