पाकिस्तानची टरकली ; डोमॅस्टीक व आंतरराष्ट्रीय उड्डाणे केली तात्काळ बंद

श्रीनगर : वृत्तसंस्था – सकाळ पासुन भारत आणि पाकिस्तानमध्ये ताणावाचे वातावरण आहे. पाकिस्तानच्या ३ विमानांनी भारतात घुसखोरी करत बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैन्यानेही आक्रमक भूमिका घेत पाकिस्तानचा डाव उधळून लावत ती विमाने परतवली आहे.

मात्र त्यानंतर पाकिस्तानी लष्कर प्रमुख मेजर जनरल असीफ गफूर यांनी नुकताच खळबळजनक दावा केला आहे. आज सकाळी पाकिस्तानच्या LOC च्या आत भारतीय एअर फोर्स ची दोन विमान दाखल झाली त्या दोन्ही विमानांना पडले. त्यातीळ एका भारतीय वैमानिकाला पाकिस्तानी सैनिकांनी ताब्यात घेतले आहे. असा दावा पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाने केला आहे. यासंदर्भातले ट्विट त्यांनी केले आहे.

परिस्थिती वेळेनुसार चिघळत आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानने आपापल्या क्षेत्रात सुरक्षा वाढवली आहे. भारतातील काश्मीरमधील श्रीनगर विमानतळ तीन तासांसाठी विमान वाहतुक रोखण्यात आली आहे. त्यासोबतच इतर विमानतळांना हाय अलर्ट देण्यात आले आहे.

तर पाकिस्ताननेही तेथील विमानतळांना हायअर्लट दिला आहे. लाहोर, मुलतान, फैसलाबाद, सियालकोट आणि इस्लामाबाद विमानतळांवर पाकिस्तानने आपले स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे ताबडतोब बंद केली आहेत.