भारताला कोंडीत पकडण्याचा पाकिस्तानचा ‘डाव’, अमेरिकेला पाठविलं ‘शिष्टमंडळ’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतासोबतचा सिंधु जल करार आणि यासंबंधीच्या वादावर चर्चा करण्यासाठी पाकिस्तानचे एक उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळ रविवारी अमेरिकेला रवाना झाले आहे.

पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार सिंधु जल आयुक्त सैय्यद मेहर अली शाह यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेत गेलेले प्रतिनिधीमंडळ चर्चेदरम्यान १९६०च्या कराराची पूर्ण अंमलबजावणी करण्याच्या मुद्द्यावर जोर देणार आहे.

पाकचे प्रतिनिधीमंडळ पाच दिवस अमेरिकेत वास्तव्य करणार आहे. यादरम्यान हे मंडळ भारताच्या किसनगंज आणि रातले या दोन उर्जा प्रकल्पांसंबंधी आपल्या शंकांचे निवारण करण्यासाठी समिती गठीत करण्याची मागणी करणार आहे.

वृत्तात म्हटले आहे की, भारताने निर्माण केलेल्या ३३० मेगावॅटच्या किसनगंज आणि ८५० मेगावॅटच्या रातले या दोन उर्जा प्रकल्पांवर पाकिस्तानचा आक्षेप आहे. त्यांचे म्हणणे आहे की या प्रकल्पातील उर्जा संयंत्र हे कराराच्या विरूद्ध आहेत.

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढल्यानंतर आपल्या वाट्याचे पानी पाकिस्तानात जाऊ न देता आडवण्यास भारताने सुरूवात केली आहे. यापूर्वी हे पाणी कोणत्याही अडथळ्याशिवाय पाकिस्तानला मिळत होते.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/