PAK पंतप्रधान इम्रान खानच्या पहिल्या पत्नीचा सल्ला; म्हणाल्या – ‘महिलांनी नाही तर पुरुषांनी बुरखा घालावा’

इस्लामाबाद : वृत्तसंस्था –  पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पहिल्या पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ यांनी थेट इम्रान खान यांच्यावर टीका केली आहे. तर बलात्काराबाबत इम्रान खान यांनी एक विधान केलं होत. या विधानावरून त्याच्यावर सर्वत्र सडकून टीका होत असतानाच त्याच्या पत्नीनेही त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

जेमिमा गोल्डस्मिथ यांनी कुराणाचा दाखला देत पुरुषांनी बुरखा घालावा असा सल्ला दिला आहे. जेमिमा म्हणाल्या, तुमच्या समर्थकांना सांगा की डोळ्यावर संयम ठेवण्यासाठी तुमचे प्रायव्हेट पार्ट बुरख्यामध्ये ठेवा. मी ज्या इम्रान खान यांना ओळखत होते त्यांचं पुरुषांच्या डोळ्यावर बुरखा असावा असं मत होतं, असे जेमिमा यांनी म्हटलं आहे. तसेच, इम्रान खानच्या दुसऱ्या पत्नी रेहम खान यांनी म्हटले की, इम्रान खान यांना कमी बोलावे असा त्यांनी दिले आहे.

या दरम्यान, पंतप्रधान इम्रान खान यांनी वाढत्या बलात्काराच्या घटना आणि अश्लीलतेला युरोप आणि भारत हे देश कारणीभूत असल्याचे त्यानीं म्हटलं होत. तसेच बलात्काराच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी मला जनतेच्या सहकार्याची गरज आहे. असे इम्रान खान यांनी जनतेशी बोलताना म्हटलं होत. तसेच, पुढे ते म्हणाले, प्रलोभनापासून वाचण्यासाठी आपल्याला बुरखा प्रथेला प्रोत्साहन दिले पाहिजे. दिल्लीला बलात्काराची राजधानी समजलं जातं तर युरोपमध्ये अश्लीलतेमुळे कुटुंब व्यवस्थाच धोक्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांनी अश्लीलता कमी करण्यासाठी मदत करणे आवश्यक आहे. असे भाष्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलं होत.