वडील रागावल्यानं आई-वडिलांसह कुटुंबातील 5 व्यक्तींना जिवंत जाळलं, पाकिस्तानमधील खळबळजनक घटना

लाहोर : वृत्तसंस्था – पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये एक खळबळजन घटना घडली असून एका तरुणाने आपल्या जन्मदात्या आई-वडीलांसाह कुटुंबातील पाच व्यक्तींना जिवंत जाळून त्यांचा खून केला. वाईट संगत असलेल्या मुलांसोबत फिरत असल्याच्या कारणावरून वडील त्याला रागावले होते. याचा राग त्याला आल्याने त्याने आई-वडीलांसह कुटुंबातील पाच व्यक्तींना जिवंत जाळले. याप्रकरणी पोलिसांनी 25 वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

ही घटना लाहोरपासून 100 किलोमिटर अंतरावर असलेल्या दुस्का शहरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी राहणाऱ्या मुहम्मद अशरफ यांच्या घराला संशयास्पद परिस्थितीत आग लावण्यात आली होती. यामध्ये अशरफ यांची पत्नी यास्मीन आणि त्यांचे तीन मुलं साबिया, फौजिया आणि हैदर यांचा होरपळून मृत्यू झाला होता. ही आग संशयास्पद वाटत असल्याने पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला होता.

वरिष्ठ पोलीस अधिकारी मुस्तानसर फिरोज यांनी सोमवारी (दि.11) पत्रकारांना सांगितले की, घटनेच्या वेळी अशरफचा मोठा मुलगा अली हमजा तेथे नव्हता. आम्ही त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. पोलीस कोठडीत असताना त्याच्या केलेल्या चौकशीत त्याने घराला आग लावून घरातील सदस्यांचा खून केल्याची कबुली दिली. घरातील सदस्य झोपलेले असताना त्याने घराला आग लावल्याचे हमजाने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी सांगिततले की, हमजा याचे वडील काहीच काम करत नव्हते त्यांनी हमजाला वाईट संगतीच्या लोकांसोबत फिरत असल्याने सारखे रागावत होते.