पाकिस्तान ‘गोत्यात’ ! चीनने रोखले सीपीईसीचे प्रोजेक्ट, नाईलाजाने घ्यावे लागणार जास्त व्याजदराने कर्ज

नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये जारी राजकीय अशांतता आणि परदेशी कर्ज मर्यादेमुळे एकीकडे पाकिस्तानमध्ये चीनी गुंतवणुकीची गती मंदावली आहे आणि दुसरीकडे चीनने 62 अरब डॉलरच्या चीन-पाक इकॉनॉमिक कॉरिडॉरचा (सीपीईसी) भाग असलेल्या योजना रोखल्या आहेत. पाकमध्ये चीनच्या या गुंतवणुक रक्कमेपैकी 2.7 अरब डॉलरच्या कर्जाची आशासुद्धा अडचणीत आली आहे.

नुकतेच पाकिस्तानने सीपीईसी गुंतवणुकीच्या एकुण रक्कमेचा एक भाग कर्जाच्या रूपात चीनकडे मागण्याची योजना बनवली होती. आशिया टाइम्समध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, सीपीईसीचे अनेक प्रोजेक्ट रोखल्याने पाकिस्तान अडचणीत आहे. यामध्ये त्या योजनांचा सुद्धा सहभाग आहे ज्या 2018 मध्ये इम्रान सरकारने केवळ यासाठी रोखल्या होत्या कारण यामध्ये मागील सरकारच्या भ्रष्टाचाराची शंका होती.

मात्र, दोन वर्षानंतर कॅबिनेटचे दोन सदस्य वीज भ्रष्टाचारात रंगहाथ सापडले होते. रिपोर्ट सांगतो की, चीन अशी रणनीतीसुद्धा आखत आहे, ज्यामुळे पाकिस्तानचा जास्त व्याजदराने कर्ज घेण्यास नाईलाज होईल. वृत्तानुसार, चीन यासाठी सुद्धा पाकिस्तानवर नाराज आहे, कारण इम्रान सरकार मोठ्या पायाभूत संरचनेच्या कामात सुस्त पडले आहे.

असीम बाजवामुळे चीनला बसला झटका
रिटायर्ड लेफ्टनंट जनरल असीम सलीम बाजवा ज्यांना सीपीईसी विभागाचे चेयरमन बनवण्यात आले होते, त्यांचे नाव सुद्धा भ्रष्टाचारात आले आहे. हे चीनसाठी कोणत्याही झटक्यापेक्षा कमी नाही. कारण खासगी हातात काम गेल्यास त्यांना भ्रष्टचाराची भिती होती, यासाठी त्यांनी लष्कराला भागीदार बनवले, परंतु तेथे सुद्धा भ्रष्टचाराची प्रकरणे येऊ लागली.

पाकिस्तानी अत्याचारांच्या विरोधात पख्तूनांची निदर्शने
पख्तून तहफुज मूव्हमेंट (पीटीएम) ने उत्तर वझीरिस्तानच्या मीरन शाहमध्ये एक सभा आयोजित करून देशात नागरिक बेपत्ता होणे, त्यांची हत्या होणे आणि अपशब्दांच्या रूपात क्रुरता नष्ट करण्याचे आव्हान केले. या दरम्यान हजारो पख्तूनांच्या हातात काळे झेंडे होते आणि ते पाकमध्ये सरकारी एजन्सीजच्या क्रुरतेच्याविरोधात पीडितांना न्याय देण्याची मागणी करत होते. या दरम्यान पाकिस्तान सीनेटचे माजी सदस्य अफरासीआब खट्टक आणि मानवाधिकार कार्यकर्ता खोर बीवी यांनी पाक लष्कर आणि आयएसआयवर आरोप केले. पाक लष्करावर पख्तून क्षेत्रात सरकार पुरस्कृत दहशतवाद पसरवण्याचा आरोप आहे.