‘ब्लॅक डे’मध्ये बदलला पाकिस्तानचा स्वतंत्रता दिवस, नागरिकांनी मागितलेली ‘आझादी’ सध्या ‘ट्रेन्ड’मध्ये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि पाकिस्तान देशांमध्ये तणावाचे वातावरण असताना पाकिस्तान १४ ऑगस्ट रोजी त्यांचा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. पण त्यांच्या या उत्साहात बलुचिस्तानच्या नागरिकांनी सहभागी न होता हा दिवस #14AugustBlackDay म्हणून ट्रेंड केला आहे. भारतीय नागरिकही बलुचिस्तानातील नागरिकांच्या स्वातंत्र्यासाठी त्यांच्या समर्थनार्थ ट्वीट करत आहेत.

पाकिस्तानच्या स्वातंत्र्यानंतर त्यांच्या जाचक आणि पक्षपाती धोरणांना कंटाळून बलुचिस्ताननेही स्वातंत्र्य मागितले होते. मात्र स्वातंत्र्य न मिळाल्याने बलुच नागरिक हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करत आहेत. बलुच नागरिकांवर जबरजस्तीने कब्जा करुन त्यांचे शोषण करण्याचा आरोपही बलुच नागरिकांनी केला आहे.

Balochistan
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू-काश्मीरमधून कमल ३७० रद्द करण्याच्या निर्णयाचे स्वागत करत तेथील बलुचिस्तानचे स्थानिक नेते नायला कादरी यांनी मोंदीचे स्मारक उभारण्याची घोषणा केली आहे. चीनच्या मदतीने पाकिस्तानने बलुचिस्तानातून बलुच लोकांची पिढी नष्ट केली आहे. ते बलुच लोकांना संपविण्याच्या मार्गावर आहे. शिवाय यावेळी त्यांनी बलुचिस्तानला स्वातंत्र मिळवून देण्याची विनंतीही भारताकडे केली.

भारत आणि पाकिस्तानला एकाच दिवशी स्वातंत्र मिळाले असले तरी पाकिस्तान एक दिवस आधीच त्यांचा स्वातंत्रदिन साजरा करत असतो. इतिहास तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार इंडियन इंडिपेडेंस विधेयकानुसार १४ आणि १५ ऑगस्टच्या रात्री दोन नवे देश उदयाला येणार होते. दोन्ही देशांना सत्ता हस्तांतरण करण्यासाठी लॉर्ड माऊंटबॅटन यांचे दिल्ली आणि कराचीमध्ये राहणे गरजेचे होते. जे एकाच वेळी शक्य नसल्याने पाकिस्तानला एक दिवस आधीच सत्ता हस्तांतरण करण्यात आले. त्यामुळे तेथे एक दिवस आधी स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो.

आरोग्यविषयक वृत्त –