पाकिस्तान ‘नरमलं’, भारताला दिलं दहशतवादी हल्ल्याचं ‘इनपुट’ ; जम्मू-काश्मीरमध्ये ‘हाय-अलर्ट’

नवी दिल्‍ली : वृत्‍तसंस्था – पाकिस्तानने पुलवामा जिल्हयातील अवंतीपुराजवळ दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तविली असून त्याबाबत भारताला माहिती दिली आहे. श्रीनगरमधील उच्चपदस्थ सुरक्षा अधिकार्‍यांनी याबाबत दुजोरा दिला आहे. हाय-अलर्टनंतर जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेत कमालीची वाढ करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी IED स्फोटकांचा एखाद्या वाहनातुन वापर करून हल्‍ला घडवुन आणण्याची शक्यता आहे.

एका इंग्रजी वर्तमान पत्राच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानने इस्लामाबाद येथील भारतीय उच्चायोगास दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेची माहिती दिली असल्याचे एका अधिकार्‍याने सांगितले आहे. याबाबत पाकिस्तानने अमेरिकेला देखील सांगितले आहे. त्यानंतर अमेरिकेने देखील भारताला याबाबत कळविले आहे. पाकिस्तान आणि अमेरिकेने दहशतवादी हल्ल्याची माहिती दिल्यानंतर हाय-अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

पाकिस्तानने दिलेल्या माहितीनुसार दहशतवादी हल्‍ला झाला तर पाकिस्तान हात वर करू शकतं. कारण, त्याने भारत आणि अमेरिकेला हल्ल्याबाबत कळविले आहे. खरोखरच पाकिस्तान भारतीय सुरक्षा यंत्रणेला सावध करीत देखील असेल असाही अंदाज बांधण्यात आला आहे. बिश्केक येथे झालेल्या बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानला कवडीची देखील किंमत दिली नव्हती.

बैठकीत दहशतवादाला खतपाणी घालणार्‍यांवर कडक कारवाई व्हावी असे देखील सांगण्यात आले होते. त्यामुळे पाकिस्तानवर सर्व स्तरावर दबाव वाढत आहे. त्यामुळे पाकिस्तानने संभावित दहशतवादी हल्ल्याच्या माहिती भारताला दिली असावी असा अंदाज भारतीय अधिकारी वर्तवित आहेत.

सिने जगत –

‘नक्षली’ होते मिथुन चक्रवर्ती ; भावाच्या मृत्यूनंतर झाले ‘असे काही’ की बनले ‘डिस्को डान्सर’

अभिनेत्री प्रियंका चोपडा सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाबाबत मोठं वक्‍तव्य

‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी ‘लव्ह’ मॅरेज केल्यानंतर पतीवर केले लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप

‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना ‘सुंदर’ दिसण्यासाठी ‘मेकअप’ची अजिबात नाही गरज