सावधान ! पाकिस्तान छापतोय 2000 च्या बनावट नोटा, कॉपी केलीय भारतीय ‘हायटेक’ टेक्नीक, ओळखणं झालं ‘मुश्कील’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील अनेक ठिकाणी जप्त केलेल्या 2000 रुपयांच्या बनावट नोटांमुळे सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने देशातून उच्च प्रतीच्या बनावट नोटा तस्करी करण्याच्या पाकिस्तानी कनेक्शनचा शोध घेतला आहे. पाकिस्तानच्या गुन्हेगारी संघटनांनी भारतीय उच्च तंत्रज्ञान कॉपी करून 2000 रुपयांच्या भारतीय नोटांची कॉपी केल्याचे उघड झाले आहे.

सुरक्षा यंत्रणेचे म्हणणे आहे की, वैशिष्ट्यांचे कॉपी करण्याचे काम उच्च अधिकाऱ्यांच्या सहभागाशिवाय शक्य नाही. एका मोठ्या षडयंत्रांतर्गत पाकिस्तानची सरकारी यंत्रणा भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी उच्च प्रतीची बनावट भारतीय चलन नोटा छापत आहे. असे या जप्त केलेल्या बनावट नोटांमुळे सिद्ध होत आहे.

एकसारख्या शाईचा वापर –

भारतात प्रथमच 2000 रुपयांची नोट छापण्यासाठी वापरल्या गेलेल्या ‘ऑप्टिकल व्हेरिएबल शाई’ बनावट नोटेसाठी वापरण्याची ही पहिलीच वेळ आहे. एजन्सीच्या वृत्तानुसार, एका अधिका-याने स्पेशल सेलला सांगितले की ही कलर शिफ्ट इफेक्टवर काम करणारी अतिशय उच्च दर्जाची स्पेशल शाई आहे. 2000 रुपयांच्या नोटेला तिरके केले असता पुढच्या भागात धाग्याचा रंग हिरवा ते निळा असा बदलला जातो. नोटांमध्ये वापरलेले उच्च भारतीय तंत्रज्ञानदेखील बनावट नोटांमध्ये वापरले जात होते

नोटेचे दुसरे वेगळे वैशिष्ट्य कॉपी केल्याचे तपासात उघड झाले आहे, नोटेच्या उजव्या आणि डाव्या बाजूला उभ्या केलेल्या दोन ओळी आहेत. या दोन रेषा दृष्टिहीन व्यक्तींसाठी नोटा ओळखण्याचे चिन्ह आहेत. सहा महिन्यांपूर्वी पकडल्या गेलेल्या बनावट नोटांमध्ये अशी सुरक्षा वैशिष्ट्ये नव्हती. यावेळी, नोटमध्ये उजव्या बाजूला खाली छापलेला क्रमांक देखील कॉपी केला गेला आहे.

सीरीज नंबरची देखील कॉपी –

यावेळी, नोटमध्ये उजव्या बाजूला खाली छापलेला क्रमांक देखील कॉपी केला गेला आहे. ‘7 एफके’ मालिका यावेळी बनावट नोटांमध्ये छापली आहे. यापूर्वी ही मालिका बनावट नोटांमध्ये छापली जात नव्हती.

बनावट नोटांचे प्रकरण असे आले उघडकीस –

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे डीसीपी प्रमोद कुमारसिंग कुशवाह यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलिस आयुक्त अतर सिंह यांच्या पथकाने 24 ऑगस्ट रोजी दिल्लीच्या नेहरू प्लेसमधून डी-कंपनी एजंट असलम अन्सारी यांना अटक केली असून त्याच्याकडून 2000 च्या नोटा असलेले साडेपाच लाखांचे बनावट भारतीय चलन जप्त केले. असलम मूळचा नेपाळचा आहे.