कंगाल पाकिस्तानची अर्थव्यवस्था भक्कम असल्याचा पाकिस्तानच्या गव्हर्नरचा  दावा 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- मित्र देशांच्या साहाय्याने पाकिस्तानची अर्थव्यवस्था भक्कम झाली असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचे गवर्नर तारिक बाजवा यांनी हा दावा केला आहे. नुकतेच सौदीचा राजपुत्राने पाकिस्तानमध्ये 20 अरब डॉलरची गुंतवणूक केली आहे. त्यानंतर बाजवा यांनी हे वक्त्यव्य केले आहे.

पाकिस्तानचे वृत्तपत्र डॉनच्या वृत्तानुसार,बाजवा यांनी एका विद्यापीठात सोमवारी एका कार्यक्रमात म्हटले की, “देशाची अर्थव्यवस्था बळकट झाली आहे. सरकारने योग्य पावले उचलली असून आर्थिक आव्हाने पेलण्यासाठी सक्षम आहे.” केंद्रीय बँकेचे गवर्नर यांनी देशाच्या चालू खात्यात (देशाच्या उत्पन्नात) घट झाल्याने अर्थव्यवस्था बिघडल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच इमरान खान यांदी देशाच्या पंतप्रधानपदाचा भार सांभाळल्यानंतर उत्पन्न वाढवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते. खान यांनी चीन, सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात, मलेशिया तसेच तुर्की सारख्या देशांचा दौरा करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणली आहे.

उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने नवीन योजना आखल्या असल्याचे त्यांनी सांगितले. उत्पन्नात झालेली घट ही देशाच्या विकासासाठी मोठे संकट आहे. हे संकट टाळण्यासाठी पाकिस्तान सरकार आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडेही मदत मागितल्याचे बावजा यांनी सांगितले आहे.