पंजाब आणि गुजरातमधून पाकिस्तान पाकिस्तान ‘या’ पध्दतीनं रचतोय भारताविरूध्द कट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सीमेवर सतत घुसखोरी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण येथे कठोरपणा दाखवल्यानंतर आता पाकिस्तान पंजाब आणि गुजरात सीमेवरुन सतत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या चार महिन्यांपासून या भागात घुसखोरीचे चार प्रयत्न झाले आहेत, पण सीमेवरील बीएसएफच्या तत्परतेने प्रत्येक वेळी हा प्रयत्न अपयशी ठरवला आहे.

गेल्या चार महिन्यांत पाकिस्तानने भारतात अशांतता निर्माण करण्याच्या धोरणात मोठा बदल केला आहे. यासाठी त्यांनी पंजाब आणि गुजरातमधील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमा निवडली आहे. बेकायदेशीर ड्रोन पाठवणे, अमली पदार्थांची तस्करी करणे आणि आपल्या नागरिकांमध्ये घुसखोरी करणे असे पाकिस्तानकडून प्रयत्न सुरु आहेत. गेल्या चार महिन्यांत गुजरात व पंजाबमधून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असलेल्या ज्या लोकांकडून सामान जप्त केले आहे, ते पाकिस्तानच्या या रणनीतीकडे इशारा करत आहे.

जम्मू-काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानला सातत्याने अपयश आले आहे. म्हणून त्यांनी आता पंजाब आणि गुजरातचा मार्ग निवडला आहे. बीएसएफच्या आकडेवारीनुसार, गेल्या चार महिन्यांत अनेकदा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानच्या निकृष्ट प्रयत्नांना जाणून घेऊया…

२६ एप्रिल रोजी प्रथमच एका पाकिस्तानी नागरिकाने अमृतसर सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता, ज्याला बीएसएफने ताबडतोब ठार केले.

२८ जुलै रोजी दोन ते तीन पाकिस्तानी नागरिकांनी गुरदासपूर सेक्टरमधून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होते, पण भारतीय सुरक्षा दलाच्या कारवाईमुळे ते तेथून पळून गेले.

८ ऑगस्ट रोजी गुजरातमधील बाडमेरमध्ये एका पाकिस्तानी नागरिकाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याला ठार केले गेले.

त्यानंतर २१ ऑगस्टच्या रात्री ५ पाकिस्तानी नागरिकांनी फिरोजपूरहून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, त्यांनाही ठार केले.

विशेष म्हणजे घुसखोरीचे हे चारही प्रयत्न रात्री केले गेले आहेत. पाकिस्तानच्या या प्रयत्नातून हे देखील सिद्ध होते की, काश्मीर ते गुजरात पर्यंतच्या सीमेपलीकडून नेहमीच हा प्रयत्न केला जात आहे, जिथे लोकांचे लक्ष जास्त नसते, तिथे संधीचा फायदा घेऊन आपला कट रचू शकतात.