हास्यासस्पद ! पाकिस्तान आता चित्रपट पाहून भारताविरुद्ध युद्धाची तयारी करतोय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रातील मोदी सरकारने जम्मू-काश्मीर मधून कलम ३७० रद्द केल्यापासून पाकिस्तानचे अनेक मंत्री सातत्याने भारताविरोधात वक्तव्य करत सुटले आहेत. आता पाकिस्तानचे रेल्वे मंत्री रशीद खान अशाच एका अजब वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. रेल्वे मंत्र्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत एका चित्रपटाचे उदाहरण देत त्यांनी भारताविरोधात स्मार्ट युद्धाची भाषा करताना दिसले.

मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्तीसारखे वक्तव्य
रेल्वे मंत्री खान यांनी उहापोह केलेल्या गोष्टीं ऐकल्यानंतर या गोष्टी कोणीतरी मानसिक संतूलन बिघडलेल्या व्यक्तीनेच बोलल्या असाव्यात असेच वाटते. पाकिस्तानने चित्रपट पाहून युद्ध लढण्याचे नवीन तंत्र अवगत केले आहे. ज्यामध्ये, भारतातील मुस्लिमांना हानी पोचणार नाही. पाकिस्तान असे स्मार्ट बॉम्ब तयार ज्याच्या वापराने केवळ हिंदू मारले जातील मुस्लिम नाही. अशा प्रकारच्या वक्तव्य करण्यासाठी खान जगभर प्रसिद्ध आहेत. यांच्या मुर्खपणामुळे त्यांची जगभर चर्चा होत असते. अशा प्रकारची वक्तव्य करून यांनी पाकिस्तानची जगभर लाज घातली आहे. एवढे होऊनही ते अशा प्रकारची वक्तव्य करणे चालूच आहेत.

आमचे स्मार्ट बॉम्ब केवळ हिंदूंना टार्गेट करतील
रेल्वे मंत्री रशीद खान यांनी पाकिस्तान मधील जिओ न्युजला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणतात की, मी आईएसबीआर हा चित्रपट पूर्ण पाहिला आहे. आमच्याकडे अणुयुद्धाशिवाय पर्याय नाहीये. याला तुम्ही अणुयद्ध म्हणू शकता किंवा स्मार्ट युद्ध म्हणू शकता. तिकडे म्हणजे भारतात मुस्लिम सुद्धा आहेत. तयामुळे आपले लक्ष्य टारगेटेड असले पाहिजे. जास्त मोठे शस्त्र आपण वापरू शकत नाही. जर कोणी पाकिस्तान च्या सीमेकडे यायचा प्रयत्न केला तर आमच्याकडे काही असे स्मार्ट बॉम्ब आहेत जे केवळ त्या भागालाच टार्गेट करू शकतील.

बेताल वक्तव्यामुळे पाक मधील मीडियाने बंदी घातली
कदाचित पाक चे रेल्वे मंत्री चित्रपट पाहून युद्धाचे डावपेच शिकत आहेत. असे वक्तव्य केलेला त्यांचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. रशीद यांच्यावर पाकिस्तानच्या नॅशनल प्रेस क्लब ने बंदी घातली आहे. तसेच इस्लामाबाद आणि रावळपिंडी येथील ऑफिसेस ने त्यांना मध्ये येण्यास मनाई केली आहे. पाकिस्तानमधील मिडिया त्यांचे कार्यक्रम कव्हर करणे सोडून दिले आहे. शेख रशीद यांची पाकिस्तान मध्ये खूप टर उडवली जात आहे. त्यांच्या कारस्थानांचे, उलट सुलट वक्तव्यांची पाक मधील सोशल मीडिया वर खूप चर्चा होत आहे.

प्रधानमंत्री मोदींचे नाव घेताच करंटचा झटका
काही दिवसांपूर्वी रशीद यांना एका भाषणादरम्यान मोदींचे नाव घेताच करंटचा जोरात झटका लागला होता. त्याचा व्हिडीओ सोशल मीडिया वर व्हायरल झाला होता. त्यांनी माईक हातात घेऊन मोदी आम्ही तुमचे मनसुबे वळून आहोत. एवढे बोलताच त्यांना करंटचा झटका बसला होता. आणि काही वेळासाठी ते बिथरले होते. त्यानंतर रशीद म्हणाले होते, करंट लागले, काही प्रॉब्लेम नाही मला वाटले की करंट आले आहे. मोदी या मानसुब्यांना व्यर्थ घालवू शकणार नाही. हे वाक्य समाजमाध्यमांवर चांगलेच व्हायरल झाले होते.

या महाशयांनी अणुयुद्धाची धमकी दिली होती
मागच्या आठवड्यात रशीद यांनी अणुयुद्धाची धमकी दिली होती. ऑक्टोबर च्या शेवटी किंवा नोव्हेम्बर- डिसेंबर मध्ये भारत पाकिस्तान मध्ये युद्ध होईल. त्यांनी अणुयुद्धाचे नाव न घेता आमच्याकडे असलेले शस्त्र काही दिवाळी ला आवाज करण्यासाठी ठेवले नाहीत. जर पाकिस्तानच्या जीवन मरणाचा प्रश्न आला तर कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तान भारतावर आक्रमण करेल. या त्यांच्या वक्तव्यावर खूप टीका केली गेली होती.

हा तर देश सोडून पाळणारा पळपुटा
मध्यंतरी अशाच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओ मध्ये त्यांनी पाकिस्तान मध्ये आण्विक परीक्षण होत असताना पाकिस्तान सोडून जाण्याची भाषा केली होती. या मुलाखतीत त्यांनी स्वतः हे काबुल केले आहे की, १९९८ मध्ये पाकिस्तान मध्ये जेव्हा आण्विक परीक्षण झाले होते तेव्हा आपण घाबरून देश सोडून जाणार असल्याचे सांगितले आहे. रशीद यांनी मुलाखतीत असे सांगितले होते की, मला या चाचण्यांची खूप भीती वाटली होती. मला कुठलीही राजकीय अथवा विशेष अशी पार्श्वभूमी नाही. चाचणी करताना थोडा फार इकडं तिकडं झाला तर यामुळे मी भीतीत होतो त्यामुळे विमान पकडून मी पाकिस्तानातून चालता झालो होतो.

रशीद यांनी लंडन मध्ये मार खाल्ला होता
भारताला अणुबॉम्बची धमकी देणाऱ्या रशीद खान सारख्या बेमुवर्तखोर माणसाला लंडन मध्ये बेदम मर खावा लागला होता. त्यांच्यावर अंडे फेकले गेले होते. त्यांना फरपटत नेवून लाता बुक्कय्या खाव्या लागल्या होत्या. असा व्यक्ती भारताला अणुयुद्धाची धमकी देत आहे. आपल्या अशा प्रकारामुळे देशाला याने आणखीनच गोत्यात आणले आहे.

You might also like