मरियम नवाझ म्हणाल्या – ‘इम्रान सरकार पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, इस्लामाबाद मार्च होणारच’

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये अकरा विरोधी पक्षांची आघाडी पाकिस्तान डेमोक्रेटिक मूव्हमेंट(पीडीएम) चे अध्यक्ष मौलाना फजलुर रहमान यांनी म्हटले आहे की आम्ही योग्य वेळी आमचे पत्ते उघड करू, त्यानंतर इम्रान सरकारला राजीनामा देण्याशिवाय दुसरा मार्गच असणार नाही.

पीएमएल-एन च्या उपाध्यक्ष मरियम नवाझ यांनी इशारा दिला की, जर इम्रान सरकारने सरळपणे 31 जानेवारीला राजीनामा दिला नाही तर विरोधक कठोर निर्णय घेण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. त्यांनी म्हटले की, आमच्या रॅलीमध्ये जी गर्दी होत आहे, जर तिला थेट इस्लामाबदला पोहचायला सांगितले तर पंतप्रधान इम्रान खान यांना लपण्यासाठी सुद्धा जागा मिळणार नाही.

मरियम नवाझ म्हणाल्या, इस्लामाबाद मार्च होणारच. याच्या तारखेची घोषणा जनतेच्या सोयीनुसार आणि हवामान पाहून केली जाईल. त्यांनी मच्छ येथील हत्याकांडावर देखील कठोर टिका केली. मरियम नवाझ यांनी इम्रान यांना बोगस आणि अकार्यक्षम पंतप्रधान म्हटले.

विरोधी पक्षांच्या आघाडीने कोणताही धोका नाही : इम्रान खान
दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे की, विरोधी पक्षांच्या आघाडीमुळे कोणताही धोका नाही. विरोधी पक्षा स्वताच आपल्या कर्माने मरतील. विरोधकांना त्यांच्या भ्रष्टचाराच्या प्रकरणात दिलासा हवा आहे. भ्रष्टाचाराच्या कोणत्याही प्रकरणात कुणालाही सुट दिली जाणार नाही.