‘पाकिस्ताना’तही उत्साहानं साजरी झाली ‘दिवाळी’, कराचीच्या मंदिरात दिसला ‘असा’ नजारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शनिवारी दिवाळीचा सण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. दिवाळीनिमित्त लोकांनी घरांमध्ये दिवे लावले आणि आपल्या घराला रंगीबेरंगी प्रकाशाने उजळून टाकले. हा दिवाळीचा सण भारतात तसेच पाकिस्तानमध्येही साजरा करण्यात आला. शेजारी देश पाकिस्तानमध्येही हिंदूंनी दीपावलीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. पाकिस्तानच्या कराचीमध्ये हिंदु समुदायाच्या लोकांनी दिवाळी संपूर्ण उत्साहात व दिवे लावून साजरी केली.

या खास प्रसंगी कराचीचे स्वामी नारायण मंदिर रंगीबेरंगी दिव्यांनी सजविण्यात आले. येथे रंगीबेरंगी लाईट्स व रांगोळीने सजावट करण्यात आली. यानिमित्ताने स्वामी नारायण मंदिरात मोठी गर्दी जमली आणि सर्वांनी मिळून दिवाळीचा सण एकत्र साजरा केला.

दिवाळीनिमित्त पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी हिंदूंना शुभेच्छा दिल्या. त्यांनी ट्वीट करत लिहिले की, सर्व हिंदू नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा. 1947 मध्ये पाकिस्तानमधील हिंदूंची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या 24 टक्के होती, ती आता कमी होऊन फक्त एक टक्क्यांच्या आसपास राहिली आहे. पाकिस्तानमध्ये मोठ्या संख्येने हिंदूंचे धर्मांतर झाले. ज्यानंतर बर्‍याच लोकांना येथून स्थलांतर करावे लागले.