PAK चा सर्वात मोठा ‘कुबूलनामा’ ! पुलवामा हल्ला इमरान खान सरकारची मोठी ‘कामगिरी’ असल्याचं मंत्र्यानच सांगितलं

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारमधील मंत्री फवाद चौधरी यांनी मान्य केले आहे की, पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता. ते म्हणाले की, पुलवामा हल्ला पाकिस्तानचे यश आहे. फवाद चौधरी यांनी पुलवामा हल्ल्याचे श्रेय इम्रान खान आणि त्यांचा पक्ष पीटीआयला दिले. त्यांनी म्हटले की पुलवामा हल्ला इम्रान खान यांच्यासाठी एक उलब्धता आहे.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामात 14 फेब्रुवारी 2019 ला सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. एका आत्मघाती दहशतवाद्याने स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्यावर आदळवली होती. या स्फोटात 40 जवान शहीद झाले होते.

फवाद चौधरी पाकिस्तानचे ते नेते आहे जे त्यांच्या वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असतात. ते नहमीच भारताला धमकी देतात आणि आपलेच हसे करून घेत असतात. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर त्यांनी अनेकदा भारताला युद्धाची धमकी दिली आहे. फवाद यांनी भारताला अणूयुद्धाची धमकीसुद्धा दिली होती. त्यांनी चंद्रयान- 2 च्या लाँचिंगनंतर सुद्धा वादग्रस्त ट्विट केले होते. मात्र, या ट्विटवरून त्यांच्यावर त्यांच्या देशात सुद्धा टीका झाली होती.

दोन दिवसात दोन कबुली

फवाद चौधरी यांच्या अगोदर पाकिस्तानचा राजकीय पक्ष पीएमएल-एनच्या खासदाराने खुलासा केला की, भारतीय हवाई दलाचे पायलट अभिनंदन यांची सुटका झाली नसती तर भारत, पाकिस्तानवर हल्ला करण्याचा तयारी होता. त्यांनी याची देखील कबुली दिली की, त्यावेळी पाकिस्तानी लष्कराची स्थिती खराब होती आणि जर पाकिस्तानने अभिनंदनला सोडले नसते, तर भारताने हल्ला केला असता.

फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने बालाकोटमध्ये एयरस्ट्राइक केला होता. त्याच्या दुसर्‍यादिवशी पाकिस्तानने आपली लढाऊ विमाने भारतात पाठवली होती, त्यांना पळवून लावताना विंग कमांडर अभिनंदन पाकच्या हद्दीत पडले होते. पाकिस्तानने त्यांना ताब्यात घेतले होते, परंतु 48 तासांच्या आत पाकिस्तानला त्यांना सोडावे लागले होते.