पाकिस्तान : ‘टांगे भी ढक कर रखें, नहीं तो नीचे से घुस सकता है ‘कोरोना’ वायरस’, इम्रान खान यांच्या महिला सल्लागाराचे विधान (व्हिडीओ)

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूमुळे जगभरात 24 लाखाहून अधिक लोकांना संसर्ग झाला असून 1 लाख 70 हजार पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानमध्ये या साथीच्या आजाराने 9 हजाराहून अधिक लोकांना लागण झाली आहे. तर जवळपास 200 लोकांनी आपला जीव गमावला आहे. या जागतिक साथीवर अद्याप कोणतेही औषध तयार झाले नसले तरी, लोकांना हात धुवून, नाक व तोंड झाकण्यासारखी खबरदारी घ्यायला सांगितले जात आहे. दरम्यान, हा विषाणू टाळण्यासाठी पाकच्या मंत्र्यंनी चमत्कारिक सल्ला दिला आहे. मंत्र्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


पाकिस्तानी पत्रकार नायला इनायतने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये पाकिस्तानचे मंत्री फिरदौस आशिक अवान यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, शरीराच्या इतर भागांप्रमाणेच आपले पाय देखील झाकणे आवश्यक आहे, कारण व्हायरस खालून देखील आत प्रवेश करू शकतो. फिरदौस हे पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे माहिती व प्रसारणाचे खास सल्लागार आहेत.

फिरदौस म्हणतात, आपले शरीर, पाय हे सुरक्षित असले पाहिजेत. असे नाही की फक्त तोंडाचे संरक्षण करणे, तर व्हायरस हा खालून देखील येऊ शकतो. या सर्व गोष्टी आपण अवलंबल्या पाहिजेत. हे देखील एक वैद्यकीय विज्ञान आहे आणि यासाठी आपल्याला एकत्र येऊन काम करायला पाहिजे. फिरदौस यांच्या या वक्तव्याचा हा व्हिडिओ 18 एप्रिल रोजी ट्विटरवर शेअर करण्यात आला होता. हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहीला असून फिरदौस यांना अनेक लोकांनी ट्विटरवर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले आहे.