इस्लामाबादमध्ये मंदिर बांधकामासाठी हिंदूचं स्वागत असल्याचं पाकिस्तानच्या मंत्र्यानं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानमधील हिंदू समुदायामधून येणाऱ्या एका मंत्र्याने शुक्रवारी खैबर पख्तूनख्वा विधानसभेत म्हटले की, इस्लामाबादमध्ये कृष्ण मंदिर बांधण्यासाठी अल्पसंख्याक समुदायाचे स्वागत आहे. महत्त्वाचे म्हणजे या कृष्ण मंदिराच्या बांधकामासाठी पाकिस्तान सरकारने १० कोटींच्या रकमेस आधीच मंजुरी दिली आहे. पाकिस्तानच्या एच-९ प्रशासन विभागाने प्रथमच एक हिंदू मंदिर बांधण्यासाठी २०,००० चौरस फूट जागा दिली आहे. इस्लामाबादमध्ये बांधले जाणारे हे पहिले हिंदू मंदिर असेल.

पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांना समान दर्जा: रवि कुमार
खैबर पख्तुनख्वा विधानसभेत बोलताना एमपीए रवी कुमार म्हणाले की, पाकिस्तानमधील अल्पसंख्यक समुदायांना समान कायदेशीर दर्जा प्राप्त आहे आणि ते येथील बहुसंख्य लोकांबरोबर परस्पर हक्कांच्या भावनेसह शांततेत राहत आहेत. ते म्हणाले की, हे बांधकाम पाकिस्तानच्या कायद्यानुसार आणि घटनेनुसार व्हावे या सरकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करू.

‘हिंदू आणि मुस्लिम यांच्यात मतभेद निर्माण करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल’
रवी कुमार म्हणाले की, जे मुस्लिम आणि हिंदू यांच्यात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यांनी विधानसभेत कृष्ण मंदिराच्या बांधकामासंदर्भात हिंदू देवतांच्या विरोधात सोशल मीडियावर केलेल्या अश्लील आणि अशोभनीय टीकेच्या विरोधात प्रस्ताव मांडला आणि या कृत्याचा तीव्र निषेधही केला.

‘पाकिस्तानसह जगातील हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत’
या नकारात्मक प्रचारामुळे हिंदू धर्माशी संबंधित असलेल्या फक्त पाकिस्तानात राहणारे हिंदूच नव्हे तर जगाच्या विविध भागात राहणाऱ्या हिंदूंच्याही भावना दुखावल्या गेल्या आहेत, असे म्हटले आहे. ते म्हणाले की, देशविरोधी घटकांनी वेगवेगळ्या समुदायांमधील भावनांना दुखावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी वेगवेगळ्या समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

मात्र, ८ जुलै रोजी इस्लामाबादमध्ये पहिले हिंदू मंदिर बांधण्याची मागणी केली होती, त्यावर पाकिस्तानच्या कोर्टाने इस्लामाबादमध्ये तीन आश्रय-याचिका फेटाळून लावल्या होत्या.