पाकिस्ताननं भिकेचा कटोरा हातात घेऊन उभा रहावं अशी मोदींची ‘इच्छा’, इम्रान खानच्या मंत्र्याला ‘भिती’

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींविषयीची भीती व्यक्त केली आहे. भीक मागण्यासाठी पाकिस्तानने हातात कटोरा घेऊन उभे राहावे अशी पंतप्रधानांची इच्छा आहे असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

पंतप्रधान मोदींविषयीची भीती व्यक्त करताना शेख रशीद म्हणाले की, ‘भीक मागण्यासाठी पाकिस्तानने हातात कटोरा घेऊन उभे राहावे अशी पंतप्रधानांची इच्छा आहे. मोदी यांचा हेतू मला समजला आहे. पाकिस्तानचे श्रीलंका आणि मालदीव व्हावे अशी त्यांची इच्छा आहे. मोदी पाकिस्तानचे पाणी बंद करून पाकिस्तानची पिके नष्ट करण्याची धमकी देत आहेत. ‘

दोन्ही देशांच्या तणावाबद्दल शेख रशीद म्हणाले की, दोन्ही देशांच्या सीमेवर धोका खूप वाढला आहे आणि तेथे अघोषित युद्ध सुरु आहे. पाकिस्तानला सीमेवर धोकादायक मर्यादेपर्यंत आव्हानांचा सामना करावा लागत आहे आणि अघोषित युद्ध सुरु आहे. सैन्य समोरासमोर उभे आहेत क्लस्टर बॉम्बही वापरला गेला आहे. लढाई झाली तर अणू युद्ध होईल हे भारताला माहित आहे.

भारतविरोधी वक्तव्यांनी शेख रशीद कायम चर्चेत असतात. काही आठवड्यांपूर्वी भारताला धमकी देताना ते म्हणाले होते की, पाकिस्तानकडे सव्वाशे ग्रॅम आणि अडीचशे ग्रॅमचे अणुबॉम्ब देखील आहेत. शिवाय त्यांचा विशिष्ट लक्ष्यावरही मारा करता येतो. भारताने हे ऐकावे की पाकिस्तानकडे पाव आणि अर्धा पाव किलोचेही अणुबॉम्ब आहेत आणि या द्वारे ते विशिष्ट लक्ष्यावर डागता येऊ शकतात.

Visit : Policenama.com