अमेरिकेच्या माजी मंत्र्याचा ‘पाक’वर ‘निशाणा’ ! विश्वासपात्र नाही, जगातील ‘धोकादायक’ देश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकाचे माजी संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस यांनी पाकिस्तानला सर्वात धोकादायक देश म्हणून संबोधले आहे. त्यांनी पाकला अणवस्त्र आणि कट्टरपंथीपणामुळे धोकादायक म्हणले आहे.

जानेवारी महिन्यात ट्रम्प प्रशासनातून राजीनामा देणाऱ्या मॅटिस यांनी सांगितले की, पाकिस्तानचे पूर्ण लक्ष भारतकडेच लागले आहे. ते भारताकडे शत्रू म्हणून पाहतात आणि याच आधारे ते अफगाणिस्तानवर नीतिचा वापर करतात. पाकचे लष्कर अफगाणिस्तानमध्ये एक मित्र असलेले सरकार आणू इच्छित आहे जे भारताच्या प्रभावाखाली नसेल.

मॅटिस यांचे आत्मचरित्र ‘कॉल साइन केओस’ मंगळवारी प्रकाशित करण्यात आले. त्यात त्यांनी लिहिले आहे की, ज्या देशात मी काम केले त्यातील पाकिस्तानला मी कट्टरपंथीपणामुळे आणि अणवस्त्र शस्त्रास्त्रामुळे खूप धोकादायक मानतो. अणवस्त्रांची वाढती निर्मिती पाहता आपण ते दहशतवाद्यांच्या हातात देऊ शकत नाही. त्याचा परिणाम अत्यंत भयानक असेल.

ते म्हणाले की, पंतप्रधान इमरान खान यांचे कॅबिनेटमधील सदस्य स्वत:च शस्त्रास्त्रांची क्षमता सांगत आहेत. पाकच्या रेल्वे मंत्री शेख रशीद यांनी सांगितले की आमच्याकडे 200 ग्रामचे अणवस्त्र आहेत जे एका सीमित भागाला लक्ष करु शकतात.

पाकच्या नेत्यांबद्दल बोलताना ते म्हणाले की, पाकचे नेते फक्त स्वत:च्या भविष्याचा विचार करतात, अमेरिका आणि पाकमधील संबंधात अनेक मतभेद आणि अविश्वास आहे. या कारणाने आमच्या पाक बरोबर असलेल्या समस्या संपत नाहीत.

लादेनला मारताना पाकला माहिती दिली नाही
मॅटिस म्हणाले की म्हणूनच ओबामा सरकार असताना ओसामा बिन लादेनला मारताना आम्ही पाकला कोणतीही सूचना दिली नव्हती. त्यावेळी मॅटिस यूएसच्या सेंट्रल कमांडचे प्रमुख होते.

आरोग्यविषयक वृत्त –