पाकिस्तानला झटका ! तालिबान सोबतची शांती प्रक्रियेची चर्चा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून बंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी एक असा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. नुकतंच ट्रम्प यांनी तालिबान सोबतची शांती वार्ता रद्द करण्याची घोषणा केली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी हा निर्णय तेव्हा घेतला, जेव्हा काबुल मध्ये झालेल्या हल्ल्याची जबाबदारी तालिबानने घेतली होती. या हल्ल्यामध्ये अमेरिकेच्या सैन्याचा १ जवान मारला गेला होता. सोबतच हल्ल्यात १२ निष्पाप लोक मारले गेले होते.

तालिबानने काबुल हल्ल्याची जबाबदारी घेणे दुर्भाग्यपूर्ण
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी एका ट्विट मध्ये असे लिहिले आहे की, तालिबानचा प्रमुख नेता तसेच अफगानिस्तानचे राष्ट्रपती कॅंप डेविड येथे एक गोपनीय भेट घेणार होते. ते आज रात्री अमेरिकेला येणार होते. येथे होऊ घातलेल्या चर्चेमध्ये आपली बाजू उजवी ठरावी यासाठी तालिबानने काबुल मध्ये झालेल्या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. हे अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे. या हल्ल्यात आमचा एक मौल्यवान सैनिक मारला गेला आणि इतरही ११ लोक मारले गेले. त्यामुळे मी नियोजित बैठक तात्काळ रद्द केली. तसेच शांती वार्तेची चर्चा थांबवली. तो तालिबान शांती वार्तेमध्ये आपली बाजू मजबूत करण्यासाठी लोकांचे जीव घेत सुटला आहे. यांनी आपली बाजू मजबूत नाही तर आणखी कमकुवत करून घेतली आहे.

शांती वार्तेत सामील होण्यासाठी अपात्र
ट्विट मध्ये ट्रम्प यांनी पुढे असेही म्हटले आहे की, जर तालिबान शांती वार्तेच्या महत्वाच्या काळात शस्त्र संधीचे उल्लंघन करण्यासाठी तयार असेल. त्यामुळेच १२ निरपराध लोकांचा बळी गेला. त्यामुळे ते कुठल्याही प्रकारे शांती वार्तेमध्ये सामील होण्यासाठी पात्र नाहीत. डोनाल्ड ट्रम्प जेव्हापासून सत्तेमध्ये आले आहेत तेव्हापासून अफगाणिस्तानमधून अमेरिकेचे सैन्य काढून घेणे हेच त्यांचे प्रथम प्राधान्य राहिले आहे. हे एक असे मिशन आहे ज्यामुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना पुन्हा एकदा निवडणुकीत यश मिळू शकते. मागच्या काही आठवड्यांमध्ये असे वाटत होते की, अमेरिका आणि तालिबान करार करण्याच्या एकदम जवळ पोहचले आहेत.

तालिबान ९/११ च्या हल्ल्याची पुनरावृत्ती होऊ देणार नाही
या करारानुसार अफगाणिस्तान मधून १६ महिन्यांमध्ये १४,००० अमेरिकेच्या सैनिकांना परत बोलावले जाणार होते. ज्यामध्ये ५,००० सैनिक १३५ दिवसांच्या आत स्वदेशात परतणार होते. त्याबदल्यात तालिबान आपणहून दहशतवाद समाप्त करण्याचे आश्वासन देईल तसेच अफगाणच्या भूमीवरून ९/११ च्या हल्ल्याची पुनरावृत्ती केली जाणार नाही.

भारताचे शांती प्रक्रियेसाठी नेहमीच समर्थन
हि घटना म्हणजे पाकिस्तान साठी एक मोठा झटका तर भारतासाठी खुशखबर ठरली आहे. भारताने नेहमी अफगाण नियंत्रण शांती प्रकियेसाठी समर्थन केले आहे. त्यामध्ये पाकिस्तानची भूमिका खोडून काढली आहे. अनेक वर्षांपासून पाकिस्तान तालिबानला मदत करत आहे. त्याचा तालिबानवर चांगलाच प्रभाव आहे. याच गोष्टींचा वापर काश्मीरच्या मुद्द्यावर आणि अमेरिकेला ब्लॅकमेलिंग करत आहे. मध्यंतरी इम्रान खान ट्रम्प यांना भेटले तेव्हा त्यांच्या चर्चेचा अजेंडा अफगाणिस्तान मध्ये शांती वार्ता हाच होता. या भेटीच्या दरम्यानच ट्रम्प यांनी काश्मीर मध्ये मध्यस्थी करण्याचा राग आळवलेला. पाकिस्तानच्या प्रति ट्रम्प यांचे बदललेले धोरण हे अफगाणिस्तान मध्ये अमेरिकेच्या शांती वार्तेचे प्रयत्न दिसून येत आहेत.

ट्रम्प प्रशासन तालिबानबाबत साशंक
या सर्व प्रक्रियेमध्ये अफगाणिस्तानला नजरअंदाज केले गेले आहे. त्यामुळे भारताला थोडं वाटत होतं. अफगाणिस्तान मध्ये अमेरिकेचे सैन्यकाढून घेतल्यानंतर देशात शांती स्थापन करण्याचे पुरेसे पाऊले उचलले गेले नाही. ट्रम्प यांच्या सरकार मध्ये सुद्धा तालिबान बाबत जास्त विश्वासार्हतेवरून प्रश्न चिन्ह निर्माण होत असतात. अनेक विश्लेषकांच्या मते, अमेरिकी सेने अफगाणिस्तान मधून परतल्यानंतर तिथे अल- कायदा आणि इस्लामिक स्टेट आपले हात पाय पसरू शकते.

भारताचे अफगाणिस्तानमध्ये रचनातम्क काम
भारताने अफगाणिस्तान मध्ये रचनात्मक काम करून योगदान दिले आहे. येथे रुग्णालय, रस्ते आणि शाळा निर्मितीमध्ये भारताने तब्बल ३ अरब डॉलर पेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. परंतु, अमेरिकी सैन्य वापसी नंतर अफगाणिस्तान मध्ये तालिबान मुख्य भूमिकेत येईल त्यामुळे येथील क्षेत्राच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल यापेक्षा अफगाणिस्तान मध्ये पाकिस्तानचा प्रभाव वाढेल.

अफगाणिस्तान पुन्हा दहशतवादाचे केंद्र होईल
शांती प्रक्रियेच्या नंतर जर तालिबान आणखी ताकतवान झाला तर अफगाणिस्तान पुन्हा एकदा दहशतवादाचे केंद्र होईल. असे झाले तर पाकिस्तान भारताचा दुश्मन असलेल्या तालिबान चा वापर काश्मीर मधील आपले मनसुबे पूर्ण करण्यासाठी करू शकतो. मध्यंतरी इम्रान खान यांनी म्हटले होते की, त्यांच्या जमिनीवर २०,०००-३०,००० आतंकवादी आहेत. भविष्यात भारताच्या विरोधात प्रॉक्सी युद्ध चालू ठेवण्यासाठी अफगाणिस्तान मध्ये शरण घेऊ शकतात. जर असे झाले तर पाकिस्तानी सेना अफगाणिस्तान मध्ये कूटनितीत भारतापेक्षा वरचढ ठरू शकतो.

पाकिस्तानने विविध पक्षांसोबत केली चर्चेची अपील
अमेरिकेने शांती वार्ता रद्द केल्यानंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा सर्व पक्षांसोबत चर्चा करण्यास सुरवात करण्याची अपील केली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून आलेल्या माहितीनुसार पाकिस्तान शांती वार्ता लवकरात लवकर सुरु होण्याची अपेक्षा करत आहे. तसेच पाकिस्तान शांती प्रक्रियेमध्ये आपली महत्वाची भूमिका निभावत आहे. आणि तो अतिशय गंभीरपणे चर्चा पुढे चालू राहण्यासाठी मदत करत आहे. एकंदरीत या घटनेमुळे पाकिस्तानला झटका बसला आहे तर ही घटना भारतासाठी एक खुशखबर ठरली आहे. तसेच जमेची बाजू ठरली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like