आता नेव्हीचा स्ट्राइक ? भारताकडून अरबी समुद्रात युद्धनौका आणि लढाऊ विमानं तैनात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू येथील पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेल्याचे दिसत आहेत .  पाकिस्तानकडून सीमा रेषेवर अजूनही कुरापती सुरूच आहेत . याच पार्श्वभूमीवर आता भारतीय नौदलानं अरबी समुद्रात आयएनएस विक्रमादित्य आणि न्यूक्लिअऱ सबमरीन असलेल्या 60 यु्द्धनौका आणि 80 लढाऊ विमानं तैनात केल्याचे समजत आहे . नौदलांच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे . दरम्यान नौदल हे पहिल्यापासूनच युद्धसराव करत आहे.
याबाबत बोलताना नौदलाचे प्रवक्ते कॅप्टन डीके शर्मा म्हणाले , ” नौदल ट्रॉपिक्स अभ्यासात व्यस्त आहे . या अभ्यासामुळे पाकिस्तानकडून होत असलेल्या बारीकसारीक हालचाली टिपता येणार आहे . भारताच्या नौदलाची यंत्रणा सक्षम असल्यानं पाकिस्ताननं अजूनपर्यंत सीमा ओलांडलेल्या नाहीत . पाकिस्ताननं असं केल्यास आम्हाला त्याची तात्काळ माहिती मिळते ” असंही शर्मा म्हणाले आहेत .  मुख्य म्हणजे नौदलाच्या जवळपास 60 युद्धनौकांसह तटरक्षक दलाच्या 12 युद्धनौका आणि 80 लढाऊ विमानं सज्ज असल्याचं समजत आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने एअर स्ट्राईक करत बालाकोटमध्ये जैश-एम-मोहम्मदच्या ठिकाणांवर हल्ला केला . तेथील दहशतवादी तळं उध्वस्त केली . यानंतर पाकने भारतीय हवाई हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला . शिवाय सीमारेषेवरही पाककडून रोज कुरापती सुरुच आहेत . याच पार्श्वभूमीवर आता नौदल कोणत्याही हल्ल्याला उत्तर देण्यासाठी तयार आहे.