पाकिस्तानी न्यूज चॅनल DAWN झालं ‘हॅक’, हॅकरनं लावला भारताचा तिरंगा झेंडा आणि लिहिली ‘ही’ गोष्ट

नवी दिल्ली : वृत्त संस्था – पाकिस्तानचा टीव्ही न्यूज चॅनल डॉन कथित प्रकारे हॅक करण्यात आला होता. रिपोर्टनुसार लाइव्ह टेलीकास्ट दरम्यान एक जाहिरात सुरू होती, जेव्हा चॅनल हॅक झाला. दावा केला जात आहे की, हे अनेक ट्विटर युजर्सने पाहिले. ट्विटरवर याची छायाचित्रे सुद्धा समोर आली आहेत.

इंडिया टूडेच्या रिपोर्टनुसार, जाहिरातीच्या दरम्यान हॅकरने टीव्ही न्यूज चॅनल डॉन हॅक करून भारतीय तिरंगा झेंडा लावला. ज्यामध्ये संदेश लिहिला होता- Happy Independence Day (स्वतंत्र्य दिवसाच्या शुभेच्छा).

टीव्ही न्यूज चॅनल डॉन रविवार (2 ऑगस्ट) दुपारी सुमारे 3:30 वाजता हॅक करण्यात आला. मात्र, यास दुजोरा मिळाला नाही की, हॅकरने संदेश किती काळ टीव्हीवर ठेवला किंवा न्यूज चॅनल किती वेळ हॅक होता.

तर, न्यूज जॉकीने ट्विटर हँडलवरून ट्विट केले, पाकिस्तानचा टीव्ही न्यूज चॅनल डॉन हॅकर्सने हॅक केला आहे. हे ट्विट काल सायंकाळी 6:46 ला केले गेले आहे. न्यूज जॉकीने हॅकचा व्हिडिओसुद्धा पोस्ट केला आहे.

तर टीव्ही न्यूज चॅनल डॉनने सुद्धा उर्दूमध्ये ट्विट करत म्हटले की, ‘ डॉन अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने प्रकरणाचा तात्काळ तपास करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, नंतर हे ट्विट डिलिट करण्यात आले.

डॉन न्यूजने जारी केलेल्या वक्तव्यात म्हटले आहे की, हा ( टीव्ही न्यूज चॅनल) नेहमी प्रमाणे प्रसारित होत होता, जेव्हा भारतीय तिरंगा आणि स्वातंत्र्य दिवसाच्या शुभेच्छा संदेश एका जाहिरातीसमोर दिसू लागला. काही काळ स्क्रीनवर संदेश होता, नंतर गायब झाला.

चॅनलने म्हटले, डॉन न्यूज भारतीय झेंडा आणि Happy Independence Day संदेश अचानक प्रसारित होण्याची चौकशी करत आहे. अंतिम निष्कर्षावर पोहचताच प्रेक्षकांना सांगण्यात येईल.