Corona Vaccination: लस घेतली नाही तर सिमकार्ड होणार Block, ‘या’ देशातील सरकारने घेतला अजब निर्णय

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – गेल्या दीड वर्षापासून जगभरात कोरोनाने (Coronavirus) थैमान घातले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अनेक देशात लसीकरण (Vaccination) मोहीम जोरात सुरु आहे. जगातील काही देशांनी लसीकरण अन् कोरोना नियमांचे काटेकोर पालन करून कोरोनावर यश मिळवले आहे. मात्र, काही देशाच्या लोकांमध्ये लसीबाबत गैरसमज, संभ्रम निर्माण झाला आहे. नागरिक अद्यापही लस घ्यायला तयार नाहीत. शेजारी राष्ट्र पाकिस्तानातही (Pakistan) लसीकरणाला (Vaccination) म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे पाक सरकारकडून दबाव तंत्राचा वापर केला जात आहे. लस (Vaccine) घेतली नाही तर सिमकार्ड बंद (Sim Card Block) करण्याचा अजब निर्णय पाक सरकारने घेतला आहे. सध्या तरी हा निर्णय पाकिस्तानमधील पंजाब (Punjab) प्रांतासाठी मर्यादित आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

पाकिस्तानमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. दररोज हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत. तसेच नव्या बाधितांची संख्याही काही हजारोंच्या घरात आहे. तरीही या देशातील लोक लसीकरणाला (Vaccination) म्हणावा तसा प्रतिसाद देताना दिसत नाहीत. त्यामुळे पाकचे आरोग्यमंत्री डॉ. यासमीन रशिद (Dr.Yasmin Rashid) यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत झालेल्या निर्णयानुसार जे लोक लस (Vaccine) घेणार नाहीत, त्यांचे मोबाईल सिमकार्ड ब्लॉक करण्यात येणार आहे.

Wab Title :- pakistan news | If vaccine is not taken sim card will be blocked

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

फुफ्फुसांची होतेय समस्या ! कोरोनातून बरे झालेले रूग्ण पुन्हा हॉस्पिटलमध्ये होताहेत दाखल, डॉक्टरांची वाढली चिंता

मुंबई : 12 तासानंतर विहिरीतून काढण्यात आली ‘ती’ गाडी, असे केले रेस्क्यू; पहा व्हिडीओ

Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये जमा करा केवळ 95 रुपये आणि मिळतील 14 लाख, जाणून घ्या कसे?

इस्त्रायलमध्ये नवीन सत्ता ! 12 वर्षानंतर बेंजामिन नेतन्याहू यांना निरोप, नफ्ताली बेनेट बनले नवीन पंतप्रधान

ST महामंडळ आता सुरु करणार पार्सल अन् कुरीअर सेवा, उत्पन्न वाढीसाठी घेतला निर्णय; वार्षिक 500 कोटींच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट

Sucheta Dalal’s Shocking Tweet | सुचेता दलाल यांचे धक्कादायक ट्विट अन् शेअर बाजार ‘कोसळला’, अदानी समूहासाठी ठरला ‘काळा’ दिवस

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा