बॉम्बस्फोटानं पाकिस्तान हादरलं ! ‘क्वेटा प्रेस क्लब’च्या जवळ ‘ब्लास्ट’मध्ये 10 जणांचा मृत्यू, 35 जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानात बलुचिस्तानच्या क्वेटामध्ये झालेल्या भीषण बॉम्ब स्फोटात 10 लोकांचा मृत्यू झाला तर 35 पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाले. हा आत्मघातकी हल्ला पोलिसांच्या वाहनाद्वारे करण्यात आला. या स्फोटात दोन पोलीस कर्मचारी देखील मृत्यूमुखी पडले. वृत्तानुसार हा स्फोट बलुचिस्तानच्या राजधानीच्या शरेआ इकबाल (Sharea Iqbal in Quetta) परिसरात झाला. त्यानंतर आता तेथे सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.

क्वेटा बलुचिस्तान प्रांताची राजधानी आहे आणि याची सीमा अफगाणिस्तान आणि इराणशी मिळते. घटनास्थळावरुन आतापर्यंत 10 मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले आहेत. हा स्फोट क्वेटाच्या प्रेस क्लब जवळ झाला. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पाकिस्तानात आज आणखी एक धक्कादायक घटना घडली. ज्यात भाज्यांच्या एका कंटेनरमधून विषारी वायू बाहेर पडला आणि त्यामुळे 4 लोकांचा मृत्यू झाला. तर 15 जणांना या विषारी वायूची बाधा झाली. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की जॅक्सन मार्केटमध्ये जेव्हा लोकांनी कंटेनर उघडला तेव्हा त्यातील धूर बाहेर आला. त्यामुळे लोकांना श्वास घेणे कठीण झाले. यात अनेक जण बेशुद्ध झाले. विषारी वायूने बाधित लोकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यात 4 लोकांचा मृत्यू झाला.

You might also like