Coronavirus In Pakistan : इमरान खान यांचे मंत्री अफ्रीदी यांना ‘कोरोना’ची लागण, ट्विट करून दिली माहिती

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – लॉकडाऊनवरील निर्बंध शिथिल केल्यापासून पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूच्या नवीन प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. देशात कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 69 हजाराच्या वर गेली आहे. याच दरम्यान इमरान सरकारमधील नारकोटिक्स कंट्रोल राज्यमंत्री शहरीयार आफ्रिदी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करून आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे. शनिवारी अफ्रिदी यांनी ट्विट करून माहिती देताना सांगितले की, माझी कोरोना व्हायरसची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्वत: ला क्वारंटाइन करून घेतले आहे. त्यांनी म्हटले की मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. शहरीयार आफ्रिदी यांच्या पूर्वी पाकिस्तानच्या अनेक नेत्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सिंधचे गव्हर्नर इमरान इस्माईल आणि नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष असद कैसर यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले होते. मात्र, आता हे दोन्ही नेते बरे झाले आहेत. त्यांच्याबरोबर सिंधचे शिक्षणमंत्री सईद गनी यांना यापूर्वी कोरोना विषाणूची लागण झाली होती. त्यांनी आफ्रिदी लवकरच बरे होतील असे ट्विट केले आहे.

24 तासात 3 हजार नवीन प्रकरणं
पाकिस्तानमध्ये गेल्या 24 तासामध्ये कोरोना संसर्गाची तब्बल 3039 नवीन प्रकरणे आढळून आली आहेत. या दरम्यान 88 रुग्णांचा मृत्यू झाला असून देशातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1447 झाली आहे. सिंध आणि पंजाब प्रांतामध्ये सर्वाधिक कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत देशातील 22 हजार 271 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

सिंधमध्ये सर्वाधिक संक्रमण
कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका सिंध प्रांताला बसला आहे. सिंधमध्ये 27 हजार 360 रुग्ण संख्या आहे. त्यानंतर पंजाबमध्ये 25056, खैबर-पख्तूनख्वामध्ये 9540, बलूचिस्तान 4193, इस्लामाबाद 2418, गिलगित-बाल्टिस्तानमध्ये 678 आणि पाक व्याप्त काश्मिरमध्ये 251 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like